संवत्सर गणेश बंधा-याची संजीवनीच्या यंत्रणेकडुन तात्काळ दुरूस्ती सुरू-सौ स्नेहलता कोल्हे.

संवत्सर गणेश बंधा-याची संजीवनीच्या यंत्रणेकडुन तात्काळ दुरूस्ती सुरू-सौ स्नेहलता कोल्हे.

Samvatsar Ganesh Bandha starts immediate repair by Sanjeevan system-Sau Snehalata Kholhe.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 11 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: तालुक्यातील संवत्सर परिसरातील नागपुर मुंबई द्रुतगती मार्गावरील रोहोम बारहाते वस्तीजवळील गणेश बंधा-याचा माती भराव अतिवृष्टीमुळे फुटून मोठया प्रमाणांत नुकसान झाले त्याच्या दुरूस्तीचे काम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या यंत्रणेने पोकलॅन व तीन जेसीबीच्या सहायाने तात्काळ हाती घेतले घटनास्थळास भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी गुरूवारी भेट देवुन पाहणी केली.

 
याबाबतची माहिती अशी की, ८ ऑगस्ट रोजी कोपरगांव तालुक्यात मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होवुन पढेगांव परिमंडळात ११० मिलीमिटर पाउस झाला. या पावसाच्या पाण्याने हा बंधारा पुर्ण क्षमतेने भरला गेला. त्यास मुंगेर पडल्याने त्याचा ४० फुट रूंद व ३० फुट खोलीचा माती भराव यात वाहुन गेल्याने त्यातील साठलेले पाणी वाया गेले भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता  कोल्हे यांनी गुरूवारी घटनास्थळास भेट देवुन याबाबतची माहिती घेतली. याप्रसंगी संचालक ज्ञानेश्वर परजणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे स्थापत्य अभियंता एस एन निकम, सिव्हील ओव्हरसियर अशोक साबळे, विजय भाकरे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, योगेश परजणे, प्रदिप लोखंडे, गणेश वरगुडे, अनिल भाकरे, सौ. रोहिणी भाकरे, संभाजी भाकरे, योगेश भाकरे, राजेंद्र नवाळे, जालिंदर रोहोम, कृष्णा निरगुडे, पप्पु वरगुडे आदि पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
या परिसरातील शेतकरी व रहिवासी नागरिकांनी पिण्यांच्या व जनावरांच्या पाण्यांसाठी तसेच भुगर्भातील पाण्यची पातळी वाढावी यासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडे बंधा-याची मागणी केली होती, त्याप्रमाणे संजीवनीच्या यंत्रणेने १९९१.९२ मध्ये सदरचा बंधारा सुमारे ७ लाख रूपये खर्च करून तयार केला होता. याची साठवण क्षमता १.७५ दशलक्ष घनफुट आहे. या बंधा-यात सध्या असलेले पाणी पुर्ण क्षमतेने साठले जावे यासाठी कोल्हे कारखान्यांच्या यंत्रणेने त्याची तात्काळ दुरूस्ती सुरू केली आहे. सौ स्नेहलता  कोल्हे यांनी बंधारा दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page