कोपरगांव बाजार समिती; कांदा १३७६ /- रुपये -प्रशासक ठोंबळ

कोपरगांव बाजार समिती; कांदा १३७६ /- रुपये -प्रशासक ठोंबळ

Kopargaon Market Committee; Onion 1376 /- Rupees -Administrator Thombal

तर तिळवणी बाजारात कांदा १२२५ /- रुपयेWhereas onion in Tilwani market Rs.1225/-

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 14 Aug, 16.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :कोपरगांव बाजार समितीत शनिवारी (१३ ऑगस्ट) रोजी ओपन कांद्याला १३७६ /- रुपये भाव मिळाला असुन आवक १२२२० क्विंटल एवढी झाली आहे.

कांदा नंबर १ ला १३७६ /- ते ११००/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर २ ला १०५० /- ते ७००/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ६५०/- ते ५०० /- रुपये भाव मिळाला.

तर शिरसगांव-तिळवणी येथील उपबाजारात शनिवारी (१३ ऑगस्ट) रोजी कांदा आवक ६३२० आली भाव कांदा नंबर १ला १२२५ /- ते १०००/- रुपये भाव मिळाला, कांदा नंबर २ ला ९५० /- ते ६००/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ५५०/- ते २५०/- रुपये भाव मिळाला.

भुसार शेतीमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.

गहु सरासरी बाजारभाव २५०१/- रुपये व सरासरी २३५१/- रूपये भाव मिळाला.
बाजरी सरासरी बाजारभाव २२५०/-रुपये भाव मिळाला.हरबरा सरासरी बाजारभाव ४७१६ /- व सरासरी ४७०९/- रूपये भाव मिळाला.सोयाबीन ६१७५/- रुपये व सरासरी ६१२५/- रूपये भाव मिळाला

असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक एन. जी. ठोंबळ यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ व उपबाजार समिती शिरसगांव-तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन. एस. रणशुर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page