कोपरगाव ; हर घर तिरंगा अभियानासाठी  ८० हजार तिरंगा ध्वजाचे वितरण -विवेक कोल्हे 

कोपरगाव ; हर घर तिरंगा अभियानासाठी  ८० हजार तिरंगा ध्वजाचे वितरण -विवेक कोल्हे 

Kopargaon; Distribution of 80 thousand tricolor flags for Har Ghar Tricolor Abhiyan – Vivek Kolhe

अमृतमहोत्सवी तिरंगा मोटारसायकल रॅलीस स्नेहलता कोल्हे यांनी दाखविला झेंडा Amritmahotsavi Tricolor Motorcycle Rally Flag displayed by Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun14 Aug, 16.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :  कोपरगांव शहरासह मतदारसंघात हर घर तिरंगा अभियानासाठी प्रशासकीय यंत्रणेसह, भाजपा पदाधिकारी यांचे मार्फत ८० हजार तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कोल्हे  कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली . शनिवारी संपूर्ण दिवसभर कोपरगाव मतदार संघात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा जय घोष सुरू होता असे त्यांनी सांगीतले.

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन  विवेक  कोल्हे यांच्या संकल्पनेतून शनिवारी संध्याकाळी पाच वाजता संजीवनी ते शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोटारसायकल रैलीस भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी झेंडा दाखविला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते. 
          
 सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली. देशनिष्ठेची ज्योत प्रत्येकाने तेवत ठेऊन हर घर तिरंगा, अभियान यशस्वी करून स्वातंत्र्यचळवळीत ज्ञात अज्ञात घटकांनी दिलेल्या योगदानाची आठवण ‘ठेवावी. 
           
विवेक कोल्हे म्हणाले की, भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात आपल्या देशाचे सर्वाधिक झेंडे ७५व्या अमृत महोत्सवी १३ ते १५ ऑगस्ट रोजी झळकले पहिजे ही विश्वसंकल्पना तुम्हा-आम्हांला दिली, ती सर्वांनी सार्थ करून दाखविण्यांसाठी पुढाकार घ्यायचा आहे. 
         
 याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक त्र्यंबकरराव सरोदे, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते,राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, कामगारनेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमीस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के ‘के शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, कामगार, शिंगणापुरच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कोल्हे कारखाना संरक्षण खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page