पोहेगांव – देर्डे को-हाळे कोळपेवाडी रस्त्यावरील खडकीनाला पुलच खचला ; शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

पोहेगांव – देर्डे को-हाळे कोळपेवाडी रस्त्यावरील खडकीनाला पुलच खचला ; शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

Pohegaon-Derde Ko-Hale Kolpewadi road bridge collapsed; Plight of farmers and students

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed.21 Sep, 19.00 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव  : पोहेगांव – देर्डे को-हाळे कोळपेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील खडकीनाला पुलच खचल्याने पोहेगांव शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाले असून शेतकरी व विद्यार्थ्यांंचे हाल होत आहे. त्यामुळे तातडीने  नाशिक जिल्ह्य हद्द ते पोहेगांव बु.रामा.६४डो-हाळे कनकुरी प्र.रामा ८(इजिमा ९ पोहेगांव देर्डे को-हाळे या रस्त्याचे व पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी पोहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यांनी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणच्या नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक नुकसान यादी समोर येत आहे. त्यात पोहेगाव च्या उत्तरेकडचा अतिमहत्त्वाचा रस्ता म्हणजे 
पोहेगांव – देर्डे को-हाळे कोळपेवाडी हा रस्ता खचल्यामुळे अत्यंत मोठमोठाले खड्डे झाले असून त्यात पावसाचे पाणी भरल्याने अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तसेच येथील खडकी नाल्यावरील पूल सिमेंट फुटल्याने वर सिमेंट नळ्या फुटून वरील काँक्रीट वाहून गेल्याने व पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे नस ल्याने पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे   शिवारात असलेले शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायिक व विद्यार्थ्यांना पोहेगाव अथवा कोळपेवाडी कडे   जाण्याचा हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरुन वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु सध्या संततधार पावसाने येथील पूलवरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी, नागरिक, प्रवासी, शेतकऱ्यांना येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुमारे पाच-सहा वर्षापासून या रस्त्याची व पुलाचे काम झालेले नाही  याबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे परंतु आज पावतो याची दखल घेतली गेली नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी जाणून-बुजून या रस्त्याचे काम टाळण्यात आल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आला आहे तसेच काम होत नसल्यामुळे  येथील नागरिकात असंतोष असून ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे  ग्रामपंचायत सरपंच यांनी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे  निवेदनात म्हटले आहे  त्यांनी   दुग्ध व्यवसाय शेतकरी, विद्यार्थ्यांची होत असलेले हाल, गैरसोय लक्षात घेवून शासनाने नव्याने रस्त्याची व पुलाची   दुरुस्ती करून दोन्ही साईडने कठडे बांधावेत   अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page