आईचे स्वप्न मी संजीवनी सॅपच्या कोर्समुळे पुर्ण करू शकलो- सचिन धट

आईचे स्वप्न मी संजीवनी सॅपच्या कोर्समुळे पुर्ण करू शकलो- सचिन धट

I was able to fulfill my mother’s dream because of Sanjeevani SAP’s course – Sachin Dhat

संजीवनीच्या  १६ अभियंत्यांची बाॅश  मध्ये निवड  Sanjeevi’s 16 engineers selected in BASH

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu .29 Sep, 16.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांवःमी तालुक्यातील भोजडे येथिल रहीवासी असुन माझे वडील हयात नाही. माझी मोठी बहिण बीडीएस करीत आहे. माझ्या आईने मला व बहिणीला जिध्दीने षिकविले. मला नोकरी मिळावी, हे आईचे स्वप्न होते,ते आईचे स्वप्न मी सॅपच्या कोर्समुळे पुर्ण करू शकलो अशा भावना संजीवनी एसएपी (सॅप) या प्रशिक्षणातून बॉश कंपनीत नोकरीस लागलेल्या सचिन धट या अभियंत्याने व्यक्त केली

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्यासाठी  एसएपी (सॅप) या प्रशिक्षणातून  अभियांत्रिकीच्या १६ नवोदित अभियंत्यांची बाॅश  ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  कंपनीत  रू ५ लाखांचे वार्षिक पॅकेजवर निवड करण्यात आली असल्याची माहिती  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
         ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये उत्कर्ष  अनिल आहेर, केतकी भुवनेश्वर  भिरूड, श्रृती सिध्दार्थ जावळे, निकिता आबासाहेब जाधव, प्रथमेश  हरेश  कदम, कृष्णा  केशव गुडदे, तृप्ती बाबासाहेब चिकने, सचिन वाल्मिक धट, गौरव भिमराव आगवन, सुमेधा संजय सम्रित, असिफ रशिद शेख , सिध्दांत सचिन पुंड, प्रणाली अशोक चौधरी , संचिता  अशोक  गोसावी, सोहम बाबासाहेब सुर्यवंशी  व अशोक  चांगदेव देवरेे यांचा समावेश  आहे.
विध्यार्थ्यांच्या  या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे तसेच संजीवनी अभियांत्रिकी  डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व सॅपचे समन्वयक डाॅ. ए. बी. पवार, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके यांचे अभिनंदन केले व निवड झालेल्या विध्यार्थ्यांना  भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
……….. 

महागडा व सर्वसामान्यांना न परवडणारा कोर्स  सॅपचे संजीवनीमध्येच अधिकृत केंद्र असल्यामुळे इंजिनिअरींगची पदवी आणि नोकरीचे पत्र बरोबरच मिळाले.’-गौरव आगवन 

Leave a Reply

You cannot copy content of this page