जुलमी करवाढीस जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती ; कोपरगावकरांवरील आर्थिक बोजा टळला

जुलमी करवाढीस जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती ; कोपरगावकरांवरील आर्थिक बोजा टळला

District Collector suspends tyrannical tax increase; The financial burden on the Kopargaon people was avoided

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची शिष्टाई सफल; भाजप सेना रिपाई आंदोलनाला यश शत -प्रतिशतEx-MLA Snehalata Kolhe’sGood manners ; 100 percent success of BJP Sena Repay movement

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir.30 Sep, 17.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची एकाधिकारशाही मालमत्ताकरवाढी संदर्भात साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी जुलमीकर वाढीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्याने कोपरगावकरांवरील आर्थिक बोजा टळला या उपोषणकर्त्यासह कोपरगावकराकडून या जुलमी करवाढ स्थगितीचे जल्लोषात स्वागत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून व फटाके फोडून पेढे भरवून आनंदोत्सव साजरा

निर्णयाचे हात उंचावून स्वागत करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे व उपोषण कर्ते

गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणास चौथ्या दिवशी माजी आमदार भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी भेट दिली सर्व परिस्थिती जाणून घेतली तातडीने त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूल मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री  ना राधाकृष्ण विखे पाटील यांना याची कल्पना दिली व घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले त्यामुळे तातडीने सूत्र हलंली दुपारी तीन वाजता शिर्डी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार विजय बोरुडे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषणकर्त्यांची व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली नंतर जिल्हाधिकारी यांच्या कानावर सर्व प्रकरण घातले त्यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चुकीच्या सर्वेक्षणा च्या आधारावर केलेली मालमत्ता कर वाढ स्थगित केली असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी या ठिकाणी जाहीर केले त्याचबरोबर त्यांनी ज्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्याची सखोल माहिती घेऊन जर त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांची ही सेवा कर्तव्यदक्ष म्हणून धरली जाईल असे सांगितले व आंदोलनकर्त्यांनी टाळ्याच्या गजरात व घोषणा देत यानंतर उपोषण मागे घेतले
यानंतर माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपविभाग शिर्डी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व उपोषणकर्ते तसेच शहरातील ज्या २५० संघटनांनी व नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा दिला त्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त केले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याबरोबर अवास्तव करवाढ संदर्भात चर्चा करताना राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे

राजकीय हेतूने कोणालातरी फायदा व्हावा यासाठी कार्यकर्त्याप्रमाणे काम करून चुकीच्या सर्वेक्षणाद्वारे अवास्तव केलेली करवाढ अंगलट येत असल्याचे दिसताच गोरगरीब कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांचा बळी देऊन स्वतः मात्र रजेवर निघून जाणाऱ्या पळपुट्या  मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. गेल्या वर्षा दीड वर्षातील त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा लागेलच असा इशाराही त्यांनी दिला त्याचप्रमाणे ज्या जनतेने लोकांनी विश्वासाने तुम्हाला निवडून दिले त्या लोकांवर आर्थिक बोजा पडत असतानाही लोकप्रतिनिधी यांनी पालिका प्रशासनाच्या होलाहो केल्याबद्दल त्यांच्यावरही परखड टीका केली
भाजप शिवसेना रिपाई आठवले गट यांनी केलेल्या आंदोलनामुळे जुलमी करवाढीला स्थगिती मिळवली याचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या शिष्टाईला यश मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट कुठेतरी धुसंर होत असताना यंदा अवकाळीने शेतकऱ्यांचे आणि शेतीपुरक उद्योजकांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात नगरपालिकेने चुकीच्या सर्वेद्वारे भांडवली मूल्यावर आधारित करात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता . ही जुलमीकरवाड रद्द व्हावी यासाठी भाजप शिवसेना रिपाई आठवले गट गेल्या चार दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषणास बसले होते पहिल्या दिवशी मुख्याधिकारी व आंदोलन यांच्यातील चर्चा निष्पळ होऊन व तिढा कायम राहिल्यानंतर मुख्याधिकारी यांनी वसुली विभागातील पाच प्रभारी लिपिकांना तडका फडकी निलंबित केले होते याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते.
पाणी असो कि स्वच्छता व आरोग्य पालिकेकडून कोणत्याही चांगल्या प्रकारच्या सेवा नागरिकांना मिळत नाही परंतु अवास्तव करवाढ करून नागरिकांची लूट करण्याचे काम पालिका करीत आहे जोपर्यंत भाडे मूल्यावर आधारित नवीन सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत कुठल्याही करवाढ आकारू नये, शहरातील विविध भागांमध्ये सद्यस्थितीत रस्ते, ड्रेनेज यासह विविध पायाभूत सुविधांची कमालीची वानवा दिसत असतानाही कोपरगाव नगरपालिकेने शहरातील रहिवाशी नागरिकांना भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करवाढीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या करवाढीमुळे नागरिकांच्या प्रचंड नाराजी आहे. विविध स्तरातून मिळणारा पाठिंबा बघता शहरातील नागरिकांकडून उमटलेल्या असंतोषाचे प्रतिबिंब उमटत होते.

अन्य नगरपालिकेच्या तुलनेत कोपरगाव शहराच्या नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या नगरपालिकेचा एक कलमी कारभार कारभार अकार्यक्षम पद्धतीने सुरू असून बांधकाम व्यवसायिकांची सुरू केलेली पिळवणूक थांबवावी तसेच भांडवली मूल्यावर आधारित ४०% करवाढ मागे घ्यावी,आर एस कन्स्ट्रक्शन नागपूर यांचा ठेका रद्द करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावी तसेच भाडे मूल्यावर आधारित फेरसर्वे करून त्यानंतरच पुढील करवाढ नागरिकांना विश्वासात घेऊन करावी तोपर्यंत जुन्याच पद्धतीने मालमत्ता कर वसुली करावा अशी विनंती भाजप शिवसेना रिपाई (आठवले गट) याच्या वतीने केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा पराग संधान यांनी सकाळी दिला होता इशारा यांनी दिला होता .

कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून १३१ कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता मिळाली होती. या कामाची निविदा मे. लक्ष्मी या कंपनीला १३१.२५ कोटी रुपयांना देण्यात आली आहे. या योजनेसाठी नगर परिषदेला दहा टक्के लोक वर्गणीसाठी ,१२ ते १३ कोटी रुपये नगर परिषदेला उभारायचे आहेत. नगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. या रकमेएवढे नगरपालिकेचे उत्पन्न सुध्दा नाही त्यामुळे करवाढ न केल्यास पाच नंबर साठवण तलावाची योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागेल. यासाठीच ही जुलमी करवाढ करण्यामागे मुख्याधिकारी व आमदार यांचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप विजय आढाव यांनी जाहीरपणे केला

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, सुनील कंगले, गुलशन होडे, विनोद ठकराल,कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना, वनिता महिला मंडळ,माता सप्तशृंगी महिला मंडळ सुभाषनगर,भोई समाज, अंपग संघटना, स्वामी विवेकानंद मंडळ लक्ष्मीनगर, कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती अंकुश वाघ, ख्रिश्चन समाज जॉन्सन मुरलीधर पाटोळे राजेंद्र योसेफ पाटोळे, गांधीनगर तरुण मंडळ शिवनारायण परदेशी,वासुदेव जोशी समाज बापु काकडे,मार्या प्रतिष्ठान म्हसोबानगर, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान,साईनगर, शिवराय तरूण मंडळ संजयनगर यासह अनेक संघटनांनी पाठींबा दिला.
यावेळी पराग संधान, केशव भवर, कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते, बाळासाहेब नरोडे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, विजय आढाव, दत्ता काले, संजय सातभाई, कैलास जाधव,रविंद्र नरोडे, दिलीप दारूणकर, जितेंद्र रणशुर, राजेंद्र बागुल योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे,जनार्दन कदम, विनोद राक्षे, अतुल काले,अविनाश पाठक, वैभव  आढाव, प्रशांत कडू, महेश गोसावी, संदीप देवकर, अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, सागर जाधव,पिंकी चोपडा, प्रसाद आढाव, मयुर लकारे, आशिश निकुंभ, सुशांत खैरे, महावीर दगडे, कैलास खैरे, आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते

Leave a Reply

You cannot copy content of this page