निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदारांना  शिवसैनिकांचा पुळका  – कैलास जाधव 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदारांना  शिवसैनिकांचा पुळका  – कैलास जाधव 

Shiv Sainiks flock to MLAs keeping elections in mind – Kailas Jadhav

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 16 Oct , 18.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :   शिवसैनिकांचा सार्थ अभिमान हे आमदार काळेंनी केलेले वक्तव्य म्हणजे ” भविष्यात येणाऱ्या नगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच मतांची गोळाबेरीज केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी केला. हे म्हणजे ” राजकारणासाठी काही पण ” अशी टिकाही  त्यांनी  प्रसिद्धी पत्रकातून केली .

अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने विकास केला राष्ट्रवादीने निधी आणला विकास हवा असेल तर राष्ट्रवादीलाच  एक हाती सत्ता द्या  असे वारंवार आव्हान केले.  परंतु सत्तांतर होताच जाहिरातीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो  गायब झाला.  त्यांना शिवसैनिकाचा अभिमान वाटू लागला  त्यामुळे यामागे राजकारण असल्याचे दिसून येत आहे. असे जाधव यांनी म्हटले आहे
  
या पुर्वीही कधीही काळे यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला काही कार्यक्रम घेतला नाही,या उलट कुठेही अभिवादन करण्यासाठी आले नाहीत. शिवसैनिक आपसात कसे झुंजत राहतील यावर लक्ष ठेवून होते. सत्तेच्या वापरातून नगरसेवकांना प्रशासनाला हाताशी धरून अपात्र करणे जेलमध्ये टाकणे    अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे उद्योगधंदे उध्वस्त करणे  यासाठीच तीन वर्षात  आमदारांनी आपली शक्ती खर्च केली हे विसरण्यासारखे नाही   
    पक्ष सोडून गेले असतानाही  ज्या  शिवसैनिकांनी माफ करून   माजी आमदार अशोकराव काळे यांना दोनदा आमदार केले  ते मात्र  शिवसेना व मातोश्री बद्दल कोणत्या शब्दात टिपण्या केल्या होत्या हे आम्ही कदापि विसरणार नाही, शिवसैनिकांचा विश्वासघात करून पक्ष सोडला.एवढे वर्ष पक्ष सोडल्यानंतर यांना कधीही शिवसैनिक आठवला नाही 
           
 कोरोना काळात रिक्षाचालकरिक्षा चालकांना कुठलीही  मदत केली नाही, एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना बसस्थानका जवळून जातांना त्या कर्मचारी सैनिकांना साधी भेट देऊन समस्या जाणून घ्यावी वाटली नाही या उलट शेजारी जेसीबी ने गुलाल उधळून घेत त्या एस टी कर्मचारी सैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे 

Leave a Reply

You cannot copy content of this page