रेशन कार्ड धारकांना मिळणारे दिवाळी पॅकेज लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – भाजपा 

रेशन कार्ड धारकांना मिळणारे दिवाळी पॅकेज लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – भाजपा 

Deliver the Diwali package to the ration card holders – BJP

राज्य सरकार : दिवाळी पॅकेज फक्त १०० रू. मध्ये State Govt : Diwali Package Rs.100 only in

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 19.30 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना दिवाळी भेट मिळणार आहे. केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय झाला. या पॅकेजमध्ये प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर तसेच १ लिटर पामतेलाचा समावेश असेल. ते  दिवाळी पॅकेज लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी कोपरगाव भाजपच्या वतीने सोमवारी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

सध्या बाजारात चणाडाळ एक किलो ६८ ते ८० रुपये, रवा एक किलो ३६ ते ५० रुपये, साखर ३९ ते ४४ रुपये, पामतेल शंभर ते ११० रुपये असे दर आहेत. तेंव्हा गोरगरिबांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा शिधा पत्रिका धारकांना साखर, रवा, पामतेल, व चणाडाळीचे कीट अवघ्या शंभर देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख खर्च येणार आहे
सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी होऊन कसलाही काळाबाजार न होता
 मालाचे पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने वितरण करण्यात यावे, तसे आदेश तहसील  सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात यावेत, असेही भाजपने या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, उपाध्यक्ष सोमनाथ म्हस्के, किरण सुपेकर,  खालिक कुरेशी,  सतीश चव्हाण,  शंकर बिऱ्हाडे,  सतीश रानोडे, तसेच गोपीनाथ सोनवणे, अशोकराव लकारे, अर्जुन मोरे, रोहिदास पाखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page