कोपरगाव:केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखवणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार अशितोष काळे यांनी दिली. शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग व उद्योजकांसाठी संतुलित तरतुदी करण्यात आल्या असून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. कृषीपूरक उद्योग, सिंचन सुविधा आणि आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
महिला सक्षमीकरण व युवकांच्या कौशल्यविकासाच्या योजना देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील विकासाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला गती येईल आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, असेही त्यांनी नमूद केले.