एक राष्ट्र एक खत योजना : मोदी यांची शेती विकासात मोलाची भूमिका – विवेक कोल्हे.
Ek Rashtra Ek Khat Yojana: Modi’s Role in Agriculture Development – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 19.20 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : भारत हा शेतीप्रधान देश असुन येथील शेतक-यांचे कृषि उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या कृषि मंत्र्यांनी धडक योजना जाहिर करून त्याची थेट शेतक-यांच्या बांधावर अंमलबजावणी केली आहे., पंतप्रधानांनी एक राष्ट्र एक खत योजनेचा शुभारंभ करून शेती विकासात मोलाची भूमिका बजावली असुन या निर्णयाचे जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी स्वागत केले आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे किसान सन्मान संमेलनात सुमारे साडेतीन लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रात रूपांतर करण्यांची घोषणा करून त्यात एकाच ठिकाणी खत, बियाणे आणि माती पाणी परिक्षणाच्या सुविधा मिळणार आहे. शेती विकासाची साधनं बदलत आहेत. ग्रामिण भागातील घटकापर्यंत ती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.
वन नेशन वन फर्टीलायझर या योजनेचा शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत युरिया बॅगचे लोकार्पण केले. स्वस्त आणि दर्जेदार खते यातुन उपलब्ध केली जाणार आहे. शेतकरी आत्मनिर्भर झाला होवुन त्याच्या शेतीचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, शेतमालाला किफायतशीर भावासह स्वाभीमान शेतकरी योजनेतुन पात्र शेतक-यांना वर्षांकाठी आर्थीक मदतही दिली आहे. नॅनो युरियाचे उत्पादन हा कृषि क्रांतीचा मोलाचा टप्पा असुन त्यातुन उत्पादन वाढ साध्य करण्यासाठी आवश्यक मदत होणार आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकरी हिताचे असंख्य निर्णय घेवुन त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली आहे.
जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शेती मध्ये मोठ्या प्रमाणांत स्पर्धा तयार झाली आहे. विकसीत देशातील शेतक-यांच्या तुलनेत विकसनशील देशातील शेतकरी तुल्यबळ ठरावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषि मंत्री जाणिवपुर्वक प्रयत्न करत असुन सर्व शेतक-यांच्यावतीने विवेक कोल्हे यांनी केंद्र शासनाचे अभिनंदन केले आहे.
Post Views:
188