ग्रामीण विकास, उद्योग व आरोग्य क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प : बिपीनदादा कोल्हे
A budget that will boost rural development, industry, and the health sector: Bipindada Kolhe
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Sun1Feb.17.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ग्रामीण विकास, उद्योगवाढ व पायाभूत सुविधांना चालना देणारा असून शेतकरी, कष्टकरी, महिला व लघुउद्योगांसाठी दिलासादायक असल्याचे मत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पादकता वाढ, मत्स्यपालनासाठी अमृत जलाशय, एआय तंत्रज्ञानाचा वापर, कापड व बायो-फार्मा उद्योगांना प्रोत्साहन, तसेच दुग्धोत्पादन व पशुपालनासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. मधुमेह व कर्करोग रुग्णांसाठी औषधे स्वस्त करणे, पाच मेडिकल हब व तीन आयुर्वेद एम्स उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण शिक्षणासाठी १५ हजार शाळांत डिजिटल सुविधा, सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी १० हजार कोटी, पायाभूत सुविधांसाठी १२ लाख कोटींची गुंतवणूक तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते, सिंचन व सौर योजनांसाठी निधी मंजूर झाल्याने विकासाला गती मिळणार असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी नमूद केले.
Post Views:
7





