संजीवनी इन्स्टिट्यूटला युएसएच्या मुक्स’ कडून दिल्लीत ‘सोशल इम्पॅक्ट’ पुरस्कार
Sanjeevani Institute awarded ‘Social Impact’ Award in Delhi by Mooks of USA
संजीवनीच्या शिक्षण क्षेत्रातील अद्यावत ज्ञानाची दखल Acknowledgment of Sanjeevi’s up-to-date knowledge in the field of education
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 3 Nov , 10.30 Am
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एम.बी.ए., इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, अशा विविध संस्थांतील ज्ञानाधिष्ठीत नवतरूण-तरूणी तयार करण्याच्याअद्ययावत ज्ञानाच्या क्षेत्रातील भरीव कामगीरीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा युएसए स्थित कोर्सेरा या मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (मुक्स) या प्रदाती कंपनीने ‘सोशल इम्पॅक्ट’ या पुरस्कारने दिल्ली येथे शानदार सोहळ्यात गौरव केला. कोर्सेराचे सीईओ जेफ मॅगिओनकाल्डा यांचे हस्ते संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व डाॅ. ए. बी. पवार (डीन अकॅडमिक्स) यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
कोर्सेरा मार्फत जगातील सुमारे १५० पेक्षा अधिक नामवंत विद्यापीठांनी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान घेण्यासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमांचे ४ ते १२ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. यात कोर्सेराच्या नियमावली नुसार ऑनलाईन व्हीडिओ लेक्चर्स ऐकणे, गृहपाठ सोडविणे, इत्यादी बाबींचा समावेश आहे. व अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेवुन यशस्वी विध्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिल्या जाते. सदर सर्टिफिकेटस्चा उपयोग नोकरी मिळण्यासाठी, नोकरीत असाल तर पदोन्नती साठी होतो. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्वच संस्थांनी आजी माजी विध्यार्थी व प्राद्यापकांना कोर्सेराद्वारा देण्यात येणारे कोर्सेस शिकण्यासाठी प्रवृत्त केले, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात आधुनिकतेची भर पडली. या सर्व बाबींची दखल घेवुन कोर्सेराच्या भारतातील तिसऱ्या वर्धापनाच्या निमित्ताने संजीवनीला सोशल इम्पॅक्ट अवार्डने सन्मानित करून संजीवनीच्या कार्याची पावती दिली.
कोर्सेराचे व्यवस्थापकिय संचालक श्री दुलेस कृष्णन , श्री मल्लव आचार्य आणि शुभांगी सुद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबध्दल श्री अमित कोल्हे यांनी त्यांचेबध्दल धन्यवाद व्यक्त केले.
कोर्सेराचे व्यवस्थापकिय संचालक श्री दुलेस कृष्णन , श्री मल्लव आचार्य आणि शुभांगी सुद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबध्दल श्री अमित कोल्हे यांनी त्यांचेबध्दल धन्यवाद व्यक्त केले.





