जम्प रोप चे खेळाडू उद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करतील – संदीप कोयटे
Jump rope players will lead the country at the international level tomorrow – Sandeep Koyote
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat5 Nov , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोणत्याही खेळातून शारीरिक सुदृढता निर्माण होते जम्प रोप क्रीडा प्रकारात उत्कृष्ट खेळाडू बनून हेच खेळाडू उद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करतील असा आत्मविश्वास नवनियुक्त जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंना ते जम्प रोप खेळाचे मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवारी (दि.४) रोजी समता पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात जिल्हा जम्प रोप असोसिएशन सहविचार सभेत संदीप कोयटे यांची अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशन अध्यक्ष निवड करण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे सल्लागार ॲड.जयंत जोशी कार्याध्यक्ष दिलीप घोडके, कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष व असो.चे सहसचिव नितीन निकम, खजिनदार प्रा.संदेश भागवत,सदस्य शिवराज पाळणे,बाबासाहेब गवारे,रोहित महाले,शुभम औताडे, सार्थक बडजाते, राहुल रुईकर, आर्यन घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते
निवडीबद्दल संदीप कोयटे यांचे समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे, अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्रीडा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन व आभार नितीन निकम यांनी मानले.