प्राचार्य डॉ. यादव यांना शैक्षणिक जीवन गौरव पुरस्कार प्रदान

प्राचार्य डॉ. यादव यांना शैक्षणिक जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Principal Dr. Yadav was awarded Academic Life Gaurav Award

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon7 Nov , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांना नुकताच मराठीचे शिलेदार समूह, नागपूर या संस्थेच्या वतीने शैक्षणिक जीवन गौरव पुरस्कार : २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली के. जे. सोमैया महाविद्यालयाला बेंगलोर येथील NAAC या संस्थेने ‘अ’ श्रेणी  देऊन गौरवण्यात आलेले असून त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाला विविध विषयांचे संशोधन केंद्र मिळालेले आहे. महाविद्यालयात मागील काही वर्षात अनेक व्यवसायाभिमुख कोर्स सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.  
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल आमदार आशुतोष काळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोक रोहमारे, रमेशराव  रोहमारे, संस्थेचे सचिव अ‍ॅड. संजीवदादा कुलकर्णी,  सदस्य संदीप रोहमारे यांनी त्यांचा सत्कार केला. 
या सत्कार सोहळ्यास संस्थेचे अनेक पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page