साडेतीन शक्तीपीठ देवी दर्शन ४५ दिवसांची सायकल यात्रा पुर्ण
Three and a half Shaktipeeth Devi Darshan 45 days cycle journey completed
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10 Nov , 16.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: शहरातील संजय नगर भागातील सुनिल कोसंदल तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी गड अशा साडेतीन शक्तीपीठाच्या परिक्रमे साठी कोपरगाव येथून सायकल वर प्रवास करत “पर्यावरण साधा, इंधन वाचवा”बेटी बचाव बेटी पढाव, असा संदेश देत शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी हिरवा झेंडा दाखवत त्यांना रवाना केले होते ते आज ४५ दिवसाचा प्रवास करून कोपरगावी सुखरूप पोहोचले आहेत.त्यांचा हा सायकल वरचा सातवा प्रवासन होता.
शिर्डी, बाभळेश्वर, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, वनी अंतापुर ताहराबाद असा त्यांचा ४५ दिवस प्रवास झाला आहे, कोसंदल हे सुतार काम, फुगे विक्रीचे काम, खुर्ची विणण्याचे कामे करतात, त्यांना या कामासाठी दूरवरून बोलवण्यात येते, ते गरीब घराण्यातले असून त्यांची देवी, देवता, गणपती आदींवर श्रद्धा आहे. त्यांचा पत्रकार महेश जोशी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सौ पद्मजा महेश जोशी यांनी त्यांचे औक्षण केले.
कोसंदल हे जवळपास १७९५ किलोमीटरचा प्रवास आपल्या मोडकळीस आलेल्या सायकल वरून करत देवी देवतांच्या कृपेने सुखरूप पोहोचले आहेत. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, आदींनी त्यांना आर्थिक मदत केली होती.
सुनिल कोसंदल यांचा विविध देवस्थानच्या वतीने सत्कार करत शुभेच्छा देऊन, त्यांना साडे तीन शक्तीपीठाच्या परिक्रमेच्या प्रवासाला रवाना केले होते. निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने सायकल चालवणे हे आरोग्यदायी आहे, असे कोसंदल यांनी आवर्जून सांगितले.
Post Views:
288