सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा – न्यायमूर्ती भुजंगराव पाटील
Use Social Media Carefully – Justice Bhujangrao Patil
कोपरगाव तालुक्यातील कायदे विषयक शिबीर समारोपLaw camp in Kopargaon taluka concluded
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun13 Nov , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही कायदा शिकवतो व्यवसायाप्रमाणे व्यवहारातही कागदोपतत्री नीटनेटकेपणा असावा, आस्थापने सीसीटीव्ही असावेत, लहान मुलांना वाहने चालविण्यास देणे टाळावे, सोशलमिडियातील वापर काळजी पूर्वक करण्याचे आवाहन जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी रविवारी (१३) रोजी कायदे विषयक शिबीर समारोपप्रसंगी अध्यक्षस्थाना वरून बोलताना केले. अनावधानाने कोणी कायद्याची चौकट मोडून वेगळे काही करत असेल तर त्याला त्याची जाणीव करुन देत कायद्याच्यापालनात जबाबदारीने केलेल्या कामाचा अभिमान बाळगावा, असेही ते यावेळी म्हणाले .
सर्वोच्च न्यायालयाचे सुचनेनुसार
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती, कोपरगाव, वकील संघ कोपरगाव यांचे वतीने अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियानाचा सांगता समारोह रविवारी (१३) रोजी अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात करण्यात आला. प्रारंभी सरस्वती प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी केले.स्वागतगीत शारदा संगीतचे प्रियंका लावर,वैभवी गोरे यांनी सादर केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित, अतिरिक्त सरकारीअभियोक्ता अशोक वहाडणे, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव खामकर, ज्येष्ठ नागरिक उमाकांत बाविस्कर,उद्धवराव विसपुते, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे उपस्थित होते.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित म्हणाले, सर्वसामान्यांना कायदे विषयक प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.कायद्याचे ज्ञान असेल तर आपण सुजाण नागरिक बनू शकतो. बदलत्या काळात तरुणांनी बदलणे आवश्यक आहे.कायद्याचे पालन करणारा नागरिक तयार करावयाचा, फसवणुकीचे प्रकार टाळून व्यापा-याने पुढच्या पिढीत विश्वासार्हता निर्माण करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त सहाय्यक अभियोक्ता अशोक वहाडणे,मनोहर येवले, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव खामकर, प्रा.डाॅ.व्ही.पी. सुपेकर, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, विधीज्ञ वैभव बागुल यांनी कायदे विषयक शिबार आणि कायदे विषयक अनुभव विषद केले.
कार्यक्रमास आत्मा मालिक एन.डी.ए. अकादमीचे मयुर धोकचौळे, मिलिटरी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, आदर्श ग्रामसेवक महेश काळे, ॲड. महेश भिडे,ॲड.संजय मंडलिक,ॲड.शितल देशमुख,ॲड.वाबळे,ॲड.कडू,ॲड.बलमे ,ॲड.भोंगळे,ॲड.एस.जी.गरुड, मुंबादेवीचे सुनील फंड,मनोज कपोते, भाऊसाहेब बागुल, कृष्णा उदावंत, तुळशीदास बागुल, रामदास बागुल, पंडित यादव,अशोक दुसाने,योगेश बागुल, विकास आढाव,संतोष देवळालीकर, सौ.कावेरी कपोते, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बंडू बडे,सागर नगरकर,सुरज माळवदे, राहुल बेडके,सागर गुरसळे यांचे सह मुंबादेवी,प्रगत शिवाजी रोड,छत्रपती शिवाजी रोड व्यापारी कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशन यांचे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सहाय्यक अभियोक्ता अशोक टुपके तर सुत्रसंचलन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.आत्मा मालिक मिलिटरी स्कूल व एन.डी.ए. अकॅडमीच्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी कोपरगाव शहरातून मनोधैर्य प्रचार फेरीचे सवाद्य आयोजन केले होते.आभार सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक जयंत विसपुते यांनी मानले.





