शहरातील अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईसाठी लागणारी कागदपत्रे भाजपाकडून नगरपालिकेला सादर
The documents required for the compensation of the victims of heavy rains in the city have been submitted by BJP to the municipality
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat19 Nov , 17.40 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : १९ ऑक्टोबर रोजीच्या पावसामुळे शहरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी लागणारे कागदपत्रं पडताळणी करून माजी आमदार भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे व संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आले आहेत
कोपरगाव शहर आणि तालुक्यात १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या प्रचंड पावसाने शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.या अतिवृष्टीने खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, शिक्षक कॉलनी, ब्रिजलालनगर, समतानगर, शारदानगर, संजयनगर, खंदक नाला आदी भागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे केले; परंतु अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
या नैसर्गिक आपत्तीने नागरिक हवालदिल झालेले सर्वात प्रथम संजीवनी उद्योग समूह आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अतिवृष्टीची झळ बसलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व कार्यकर्त्यांनीही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्तांना मदत केली.
याप्रसंगी दीपक जपे, पप्पू दिवेकर, युनूस बागवान, खंडू वाघ, निलेश डोखे, रहीमखा पठाण, समीर पठाण आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे व इतर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून आपद्ग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विवेक कोल्हे, पराग संधान, दत्तात्रय काले, दीपक जपे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Post Views:
167