कोपरगाव तालुका नागरी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष सुपेकर, उपाध्यक्ष वाघ
Kopargaon Taluka Urban Bank Employees Credit Union President Supekar, Vice President Vagh
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat19 Nov , 17.50 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव पिपल्स बँक व गौतम सहकारी बँकेचे सेवकांचे पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२०२७ करीता नुकतीच निवडणूक पार पडली. चेअरमन पदी राजेंद्र सुपेकर तर व्हा. चेअरमन पदी दत्तू वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन संचालक पदी सुरेश भगवंतराव देशमुख, राजेंद्र भास्कर पवार, दिलीप मच्छिंद्रनाथ उगले, विष्णू भिमराज होन, संजय सोपान ठाणगे, किशोर परसराम आगवन, दत्तू बनकर वाघ, शैलेश गोरख कदम, राजेंद्र बाळासाहेब सुपेकर, प्राजक्ता परेश श्रॉफ, मंगल प्रदीप सदाफळ यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी राजेंद्र राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,
यात चेअरमन पदाकरिता राजेंद्र सुपेकर यांचे नावाची सूचना राजेंद्र पवार यांनी आणली, त्यास सुरेश देशमुख यांनी अनुमोदन दिले, तर व्हा. चेअरमन पदाकरिता दत्तू वाघ यांचे नावाची सूचना विष्णू होन यांनी आणली, त्यास किशोर आगवण यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाकरिता एक-एकच अर्ज आल्याने दोघांचीही एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजेंद्र राहाणे यांनी जाहीर केले, यावेळी पिपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे व गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड, विठ्ठल रोठे, चंद्रशेखर व्यास यांनी सदर निवडीबद्दल अभिनंदन केले, सेक्रेटरी जितेंद्र छाजेड व सेवक प्रदीप मेढे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे, निवडणूक अधिकारी राजेंद्र राहाणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Post Views:
176