कोपरगावतील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी-भाजप
Shops in Kopargaon should be allowed to open till 11 pm-BJP
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir25 Nov , 16.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पोलिस प्रशासनाच्या आदेशान्वये कोपरगाव शहरातील दुकाने रात्री १० वाजताच बंद केली जात असल्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, नागरिकांचीही गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी शहरातील सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव आढाव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, माजी नगरसेवक बबलू वाणी, व्यापारी संघर्ष समितीचे अकबरभाई शेख, अन्सारभाई शेख, निसारभाई शेख, राजेंद्र बागुल, भाजप अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालिककभाई कुरेशी, गोपीनाथ गायकवाड, विनोद नाईकवाडे, किरण सुपेकर, वैभव गिरमे, विजय चव्हाणके, दीपक जपे, कचरुभाऊ लोहकणे, किसान सेलचे अध्यक्ष सतीश रानोडे, सचिन सावंत, शंकर बिऱ्हाडे, गोरख देवडे, इलियासभाई शेख, फकीर महंमद पहिलवान, सोमनाथ ताकवले आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एच. दाते यांनी हे निवेदन स्वीकारले.
Post Views:
240