धारणगावात  कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम , राष्ट्रवादीत प्रवेश

धारणगावात  कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम , राष्ट्रवादीत प्रवेश

In Dharangaon, workers of the Kolhe group joined the BJP and joined the NCP

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 Dec22 , 17.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव– ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव मध्ये कोल्हे गटाला मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी वैजापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे उपस्थित होते.त्यांनी एकाचवेळी एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश पाहून आ.आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले व या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहम, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,माजी सरपंच नानासाहेब चौधरी, गौतम सहकारी बँकेचे संचालक साहेबलाल शेख, रघुनाथ जाधव, रावसाहेब चौधरी, गोरख चौधरी, राजेंद्र जाधव, मंगेश जिरे, निखिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपच्या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाजीराव रणशुर, छबुराव थोरात, रघुनाथ मोहिते, नितीन थोरात, अण्णासाहेब मोहिते, सुनील मोहिते, दीपक मोहिते, देविदास जाधव, हरिदास जाधव, विनोद मोहिते, गोकुळ मोहिते, विष्णू मोहिते, संतोष मोहिते, अनिल मोहिते, विजय मोहिते, अक्षय मोहिते, किरण मोहिते, शांताराम मोहिते, वाल्मीक मोहिते, सागर मोहिते, मंगलदास जाधव, रवींद्र पवार, अरुण पवार, सागर पवार, आकाश पवार, संदीप पवार, विकी जाधव, अविनाश जाधव, संजय मोहिते, विशाल मोहिते, रोहित मोहिते, महेश मोहिते, विकी चव्हाण, राजू चव्हाण, कैलास चव्हाण, विलास चव्हाण, आकाश चव्हाण,  राजू जाधव, अनिल मोहिते, रमेश पवार, विशाल पवार, मोहन मोहिते, संतोष मोहिते, अंकुश जाधव, प्रवीण जाधव, बाळू जाधव, प्रकाश जाधव, राजेंद्र पवार, विकी पवार, मोहन चव्हाण, दिनेश पवार, चंद्रभान पवार, योगेश जाधव, अर्जुन जाधव, गौतम चव्हाण, निलेश मांजरे, अक्षय भालेराव, नंदू जाधव, अंबादास वाकळे, सागर शेजवळ, ज्ञानदेव रणशूर, अनिल उघडे, सुरेश ठोंबरे, विक्रम पवार, जनार्दन रणशूर, राहुल रणशूर, गौतम केदारे, नारायण अव्हाणे, लक्ष्मण भालेराव, सोमनाथ तुपसुंदर, गणेश लोखंडे, संतोष दळवी, दिनेश थोरात, दत्तात्रय थोरात, नितीन थोरात, सोपान थोरात, विलास थोरात, संतोष थोरात या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page