भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकला -बिपीनदादा कोल्हे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकला -बिपीनदादा कोल्हे

Bharat Ratna Dr. It is because of Babasaheb Ambedkar that a common man could rise to the highest position – Bipindada Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 Dec22 , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सर्वसमावेशक संविधानामुळेच दीन-दलित, कष्टकरी, शोषित, वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क व अधिकार प्राप्त झाल्याने  सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकला, असे विचार संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मंगळवारी (६ डिसेंबर) रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतांना केले.

कोपरगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर एस. टी. बसस्थानकाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष देवराम पगारे, माजी नगरसेवक बबलू वाणी, रवींद्र रोहमारे, दिनेश कांबळे, अशोक लकारे, गोपीनाथ गायकवाड, किरण सुपेकर, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, दीपक जपे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, सोमनाथ म्हस्के, चंद्रकांत वाघमारे, संतोष नेरे, संतोष साबळे, संजय खरोटे, अनिताताई साळवे, सोमनाथ आहिरे आदींसह भाजप,युवा मोर्चा व आर.पी.आय. चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 बिपीनदादा कोल्हे  म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे तत्त्व आणि मानवतावादी विचारवंत होते.  त्यांनी देशाला, समाजाला दिशा आणि प्रगतीचा विचार दिला. त्यांच्यामुळे देशात सामाजिक क्रांती झाली. समानता, एकात्मता, अखंडता आणि बंधुभावाचा विचार रुजला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ असा मूलमंत्र त्यांनी दिला.   सामाजिक समता, सामाजिक न्याय, बंधुता या मूल्यांची जोपासना व्हावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page