ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका पोलीस स्टेशन सज्ज –  दौलतराव जाधव

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका पोलीस स्टेशन सज्ज –  दौलतराव जाधव

Taluka Police Station ready for Gram Panchayat Election – Daulatrao Jadhav

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 Dec22 , 17.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरघाव : ग्रामपंचायतची निवडणूक म्हटलं की एकाने आरे म्हटले की दुसरा कारे म्हणतो मग वाद निर्माण होतात. तोतयेगिरी करणारे आणखीन चेतावणी देतात. एकमेकांवर चिखल फेक निंदा नांलस्ती बदनामी करणे यामुळे राग निर्माण होऊन वाद घडतात. निवडणुकीच्या ठिकाणी शांततेचा भंग व पोलिसांना आरेरावी केली तर याबाबत कारवाईसाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन सज्ज आहे असा इशारा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सोनी वाडे सोनेवाडी येथे  ग्रामपंचायत निवडणूक शांतता सभेत  बोलताना  दिला.

  कोपरगाव तालुक्यात होऊ घातलेल्या २६  ग्रामपंचायत निवडणुका पैकी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून त्या शांततेत पार पडण्याची जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आप्पासाहेब जावळे, तुकाराम गुडघे, आनंदराव जावळे, आनाजी जावळे, विश्वनाथ जावळे, शिवाजी जावळे, उपसरपंच किशोर जावळे, शिवाजी जावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे ,संदीप गुडघे ,पोलीस पाटील दगू गुडघे, गणपत राऊत, भास्कर जावळे नंदू जायपत्रे केशवराव जावळे ,चिलू जावळे ,आबा जावळे ,गीताराम जावळे, केके जावळे ,राजेंद्र जावळे, मनराज जावळे , द्वारकनाथ चव्हाण, मुक्तानाथ जावळे, धोंडीराम जावळे ,भास्कर जावळे, धोंडीराम जावळे, कांतीलाल जावळे ,कर्णा जाधव, भाऊसाहेब खरे ,ग्रामसेवक विजय जोर्वेकर अदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार करू असे आश्वासन सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण जावळे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page