आमदार काळेंचे दुर्लक्ष नगरपालिकेचा गलथानपणा; शहरावर पाणीटंचाईचे संकट 

आमदार काळेंचे दुर्लक्ष नगरपालिकेचा गलथानपणा; शहरावर पाणीटंचाईचे संकट 

Negligence of MLA Kalen; Misconduct of the municipality; Water crisis in the city

कोपरगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा, तीव्र आंदोलनाचा युतीचा इशाराFix water supply to Kopargaon, alliance warns of intense agitation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 22 Dec 22 , 20.00 Pm By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : गोदावरी कालव्याचे काम चालू असून काम होताच रोटेशन येऊन चार दिवसाआड पाणी होईल असे आश्वासन आमदार आशुतोष काळे व नगरपालिकेने दिले होते. परंतु दीड महिना उलटला तरी अद्यापही शहराला आठ दिवसाने दूषित व घाण पाणी मिळत आहे, तातडीने पाणीटंचाई दूर करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा  भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युतीने दिला आहे.

भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पालिकेच्या श्वेता शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. 
               भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे माजी न. प. गटनेते रवींद्र पाठक, माजीउपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, बबलू ऊर्फ नयनकुमार वाणी, राजेंद्र बागुल,  आदींसह भाजप, शिवसेना व रिपाइं (आठवले गट) चे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली; पण काही विघ्नसंतोषी लोकांनी यामध्ये राजकारण आणून त्यास विरोध केला. त्यामुळे ही योजना बाजूला पडली असून गेल्या तीन वर्षापासून पाच नंबर साठवण तळ्याचे नाटक करून शहरवासीयांना वेड्यात काढले त्याचेही काम आज बंद आहे.
               
कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष, समाजाचे अध्यक्ष, विविध संस्था, संघटनांचे प्रमुख, समाजसेवक, नागरिक यांनी निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याची एकमुखी मागणी शासनाकडे करावी, असे आवाहन शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले.
  स्नेहलता कोल्हे यांना श्रेय मिळू नये म्हणून न्यायालयात जाऊन  निळवंडे च्या पाण्याला विरोध केल्यानेच कोपरगावकरांवर आजही आठ दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली असल्याचा आरोप  माजी नगराध्यक्ष संजय सातभाई व राजेंद्र सोनवणे यांनी केला निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजनेसाठी आता नागरिकांनीच पालिकेच्या विरोधात उठाव केला पाहिजे असा असे आव्हानही त्यांनी केले
 कोपरगावच्या व्यापाराला चालना देणारी चांदेकसारे येथील स्मार्ट सिटी घालवून आता समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजला कोपरगावचे नाव द्या, अशी मागणी करणे हास्यास्पद असल्याची  मिस्कील टीका शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी  आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली . 
             
 निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजनेचा सर्व खर्च साईबाबा संस्थान शिर्डी हे करणार होते परंतु विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी या योजनेत खोडा घातला.  सुदैवाने साई संस्थांचे अध्यक्ष पद आमदार आशुतोष काळे यांना मिळाले होते मनात आणले असते तर निळवंडे कोपरगाव पाणी प्रश्न झटक्यात सोडवता आला असता पण दुर्दैवाने तसे झाले नाही अशी खंत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी केला.
 
रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर म्हणाले, जानेवारी मध्ये जर १५ दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होणार असेल तर स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणून घेणा-या आमदार आशुतोष काळे यांनी हीही जबाबदारी कुटुंब प्रमुख या नात्यानेच स्वीकारावी, महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षात काळेंना कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविता आला नाही हे दुर्दैव आहे श्रेयाच्या भीतीपोटी ज्या निळवंडे पाणी योजनेला न्यायालयातून कोणामार्फत विरोध झाला हे सर्वश्रुत आहे  येत्या अडीच वर्षात शिंदे भाजप युतीच्या शासनामार्फत निळवंडे ची योजना आम्ही निश्चितच मार्गी लावू असा निर्धार रणशूर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page