कोपरगावात “ग्रामीण  पोलीस स्टेशन म्हणजे विटा-सिमेंट नव्हे, सुरक्षितेची हमी”– आ. आशुतोष काळे; 

कोपरगावात “ग्रामीण  पोलीस स्टेशन म्हणजे विटा-सिमेंट नव्हे, सुरक्षितेची हमी”– आ. आशुतोष काळे;

In Kopargaon, “Rural Police Station is not a brick and cement, but a guarantee of safety” – MLA Ashutosh Kale;

आमदार काळेंचे श्रेयवादावर राजकीय टोले,“निधीच्या राजकारणावर सूचक चिमटे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March4 Wed.16.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व ६४ पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. “पोलीस स्टेशन ही केवळ इमारत नाही, ती नागरिकांच्या सुरक्षितेची हमी आहे,” असा ठाम संदेश देत आ. आशुतोष काळे यांनी विकास कामासोबतच आ काळेंचे श्रेयवादावर राजकीय टोले, व “निधीच्या राजकारणावर सूचक चिमटे घेत राजकीय अंगानेही धारदार भाष्य केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी फॉरेन्सिक व्हॅनचेही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

आ. काळे यांनी भाषणात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पुढाकाराची आठवण करून देत २०१३ मध्ये शहर व ग्रामीण अशी स्वतंत्र पोलीस स्टेशनची संकल्पना कशी राबवली गेली, याचा उल्लेख केला. “त्या वेळी पोलीस बांधवांना अपुऱ्या सुविधांमध्ये काम करावे लागत होते. परिस्थिती मंत्रालयापर्यंत पोहोचवून स्व. अजित पवार यांच्या माध्यमातून २५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला,” असे सांगत त्यांनी पाठपुराव्याची कहाणी उलगडत त्यांनी निधी मिळवण्यात आपली भूमिका अधोरेखित केली.

त्याचवेळी त्यांनी सूचक टोला लगावत म्हटले, “कामासाठी धावपळ करावी लागते; फक्त फित कापताना फोटो काढून विकास होत नाही.” या वाक्याने उपस्थितांमध्ये हलकी खसखस पसरली.

तालुक्यात अजूनही अवैध धंदे,कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न शिल्लक असल्याचे नमूद करत “ अर्थफसवणूक आणि अमली पदार्थांच्या रॅकेटचे सावट असल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद करत आ. काळे म्हणाले, “नवी इमारत म्हणजे केवळ फोटोसेशन नाही;जबाबदारीची नवी सुरुवात आहे. सुविधा मिळाल्या आहेत, आता कारवाईतही तेवढीच धार दिसली “ परिणाम दिसले पाहिजेत,” असा सूचक टोला प्रशासनाला लगावला.

पालकमंत्री विखे पाटील यांनीही जिल्ह्यातील अर्थफसवणूक आणि अमली पदार्थांच्या रॅकेटवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली. “पोलिसांना सुविधा देतो, पण कारवाईत कुठेही ढिलाई चालणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश देत “जिल्हा सुरक्षित ठेवणे हीच खरी प्राधान्याची बाब आहे,” असे सांगितले. महायुती सरकारच्या वतीने पोलिसांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपस्थित मान्यवरांमध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, माजी आ. स्नेहलता कोल्हे, राजेश आबा परजणे, राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पराग संधान, नितीन औताडे, काकासाहेब कोयटे, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर परजणे, संजय अगवण, संभाजी काळे, विश्वासराव महाले, अरुण येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विकासाच्या कामांचा उल्लेख होत असताना श्रेयवादाची कुजबुजही रंगली. “निधी कोणी आणला, पाठपुरावा कोणी केला आणि काम पूर्ण कोणी केले, हे जनता पाहत असते,” असा आणखी एक टोला आ. काळे यांनी लगावला.

कोपरगावात उभ्या राहिलेल्या या नव्या इमारतीमुळे पोलिसांना आधुनिक सुविधा मिळाल्या असल्या, तरी आता अपेक्षा आहे ती ठोस कारवाईची. कारण इमारती उभ्या राहतात, पण विश्वास उभा करावा लागतो—आणि तोच खरा कस लागणार आहे.

चौकट 

कोपरगावात उभी राहिलेली ही नवी इमारत केवळ प्रशासकीय सुविधा नसून राजकीय ताकदीचे प्रदर्शनही ठरल्याची चर्चा रंगली. विकासाच्या श्रेयवादात पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापले असून, “काम झाले, आता परिणाम दाखवा,” हा संदेश या सोहळ्यातून स्पष्टपणे उमटला.

Leave a Reply

You cannot copy content of this page