संजीवनी फार्मसीच्या २४ विद्यार्थ्यांची ग्लेनमार्कमध्ये थेट निवड
24 Sanjeevani Pharmacy students get direct selection in Glenmark
ऑटोनॉमस अभ्यासक्रमाचा लाभ; उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार घडलेले यश
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March4 Wed.16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : संजीवनी फार्मसी महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या तब्बल २४ विद्यार्थ्यांची नामांकित औषधनिर्मिती कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्समध्ये नोकरीसाठी थेट निवड झाली आहे. महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या ऑटोनॉमस दर्जामुळे उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रम राबविण्यात आला असून त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीपणे पार पडली. गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांनी आकर्षक वेतनासह नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळवली.
बी. फार्मसीमधून सोमनाथ अव्हाड, अनुष्का देशमानकर, मधुरा देव, अक्षय रक्ताटे, प्राची कदम, तमन्ना सय्यद, यश भोसले, सानिका शेटे, धनंजय शिंदे, पूजा सांगळे, श्रेया आहेर, श्रद्धा माळी, साक्षी मांजरे, रूपाली शिंदे, गायत्री जाधव, अंजली जाधव व अवांतिका दोडे यांची निवड झाली आहे.
एम. फार्मसीमधून अजय काटे, मनीषा भडे, प्राजक्ता निर्भवणे, साक्षी शेळके, भावना नलगे, फाल्गुणी छाजेड व अश्विनी दळे यांना संधी मिळाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, डॉ. रावसाहेब शेंडगे, डॉ. प्रमोद कडू, प्रा. निखिल गुलघने व प्रा. प्रतिक्षा घोडके उपस्थित होते.
चौकट : उद्योगसिद्ध शिक्षणाचा परिणाम
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सही औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीच्या अपेक्षांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाने सातत्याने प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून पहिल्याच मुलाखतीत २४ विद्यार्थ्यांची निवड झाली. हे संजीवनी परिवाराच्या टीमवर्कचे आणि गुणवत्तेच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी सांगितले.
Post Views:
2





