धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षाआणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या नोंदणी प्रक्रियेवर सविस्तर चर्चा
Dharamveer Anand Dighe detailed discussion on the registration process of Auto Rickshaw and Metered Taxi Drivers Welfare Corporation
कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेच्या बैठकीत नियम सुलभतेची मागणी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March4 Wed.16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : रिक्षाचालकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या नोंदणी प्रक्रियेबाबत कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत नोंदणीतील अडचणी, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळविण्याची प्रक्रिया यावर थेट संवाद साधण्यात आला.
मोटार वाहन निरीक्षक विशाल मोरे यांनी संघटनेचे निवेदन लक्षपूर्वक ऐकून घेत, संबंधित मुद्द्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. काही विषय मंत्रालयाशी संबंधित असल्याने ते पुढे पाठवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे यांनी महामंडळाच्या नियमावली, उपलब्ध योजना आणि नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.मात्र, लाभ मिळवण्यासाठीची कागदपत्रांची किचकट अट व वाढतीआर्थिक जबाबदारी सर्वसामान्य रिक्षाचालकांना परवडणारी नसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि जलद व्हावी, अशी ठाम मागणी संघटनेने मांडली.
चर्चेत संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी भाग घेतला.
बैठकीत रेल्वे स्टेशन परिसरातील अडचणी, वाढते दंड, विमा व करप्रक्रियेबाबतही चर्चा झाली. संघटनेने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले.एकंदरीत, नोंदणी प्रक्रियेतील अडथळे दूर करून रिक्षाचालकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, या उद्देशाने ही बैठक सकारात्मक आणि आशादायी ठरली.
यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक विशाल मोरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निकिता खंडीझोड, रिक्षा संघटना संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, इरफान शेख, मल्हारी देशमुख, प्रकाश शेळके, भाऊसाहेब जाधव, सागर जाधव,राजेंद्र कोपरे, सुनील तांबट, अनिल वाघ, पापा तांबोळी आदी मान्यवरांसह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते
Post Views:
12





