पंढरपूर ते घुमान सायकल वारी ;  प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांचा  सत्कार

पंढरपूर ते घुमान सायकल वारी ;  प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांचा  सत्कार 

Pandharpur to Ghuman Cycle Wari; Tribute to Prashant Nikumbh and Rajendra Salke

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun25 Dec22 , 19.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव ‌:  श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १०० सायकलस्वारांनी श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) अशी २३०० किलोमीटरची सायकल वारी २३ दिवसांत पूर्ण केली. यामध्ये कोपरगाव सायकल ग्रुपचे सदस्य प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांनीसुद्धा सहभाग नोंदवून ही सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी निकुंभ व सालके यांचा कोपरगाव तालुका क्रीडा संकुल व कोपरगाव सायकल ग्रुपच्या वतीने सत्कार केला.

कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, प्रशांत होन, संदीप देवकर, बापू सुराळकर, विवेक खांडेकर, दिनेश कोल्हे, दिगंबर बनकर, योगेश देशमुख, संतोष नेरे, शरद कदम, आकाश वडांगळे, चेतन भास्कर आदी उपस्थित होते.
              संत नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूरपासून पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र घुमानपर्यंत सायकल वारीचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.
             पंढरपूर आणि घुमान या दोन्ही तीर्थस्थळांना मोठा अध्यात्मिक वारसा आहे. या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यान काढण्यात आलेल्या या सायकल वारीमध्ये महाराष्ट्रातील शंभर सायकलपटू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page