नाताळला पाणीटंचाई; ख्रिश्चन समाजाकडून पालिकेचा  निषेध 

नाताळला पाणीटंचाई; ख्रिश्चन समाजाकडून पालिकेचा  निषेध 

Christmas water shortage; The municipality was condemned by the Christian community

लता त्रिभुवन व्यक्त केला संताप Lata Tribhuvan expressed her anger

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon26 Dec22 , 18.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :   नाताळ हा ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. या सणाच्या दिवशीसुद्धा ख्रिश्चन समाजाला पाणी मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. ख्रिश्चन समाजाला पाणी आणि इतर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, अशा शब्दांत लताताई त्रिभुवन यांनी नगर परिषदेच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त करून ख्रिश्चन समाजाच्या वतीने न.प. प्रशासनाचा जाहीर निषेध केला. व आजी-माजी आमदारांनी याकडे लक्ष देऊन ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. हा समाज कधीही रस्त्यावर उतरत नाही. कोपरगाव शहरात ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येने राहतो. नाताळ हा ख्रिश्चन समाजासाठी फार महत्त्वाचा, आनंदाचा आणि मोठा सण आहे. नेमका नाताळ आला की, पाणी मिळत नाही. पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. नाताळ सणानिमित्त आमच्याकडे पाहुणे येतात. नेमके नाताळच्या सणाला आम्हाला पाणी मिळत नाही. पाण्याअभावी आमचे खूप हाल होतात. खूप त्रास होतो. नगर परिषद प्रशासन आमच्या या समस्येकडे लक्ष देत नाही. मी यासाठी आंदोलन करणार होते. नाताळच्या सणाला पाणीपुरवठा न करणाऱ्या नगर परिषदेचा ख्रिस्ती समाजातर्फे मी तीव्र निषेध करते. 
नगर परिषदेने आमच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पाण्याची व्यवस्था करावी.आम्ही मनुष्याकडे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही की, तुम्ही आमच्या गरजा पुरवाव्यात; पण देवाने जर तुम्हाला लोकांची सेवा करण्याचा अधिकार दिला आहे तर मग दोन्ही आमदारांनी आमच्यासाठी, आमच्या ख्रिश्चन समाजाच्या सणासाठी पाण्याची तरतूद केली पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे लताताई त्रिभुवन यांनी सांगितले.
            गेल्या दीड महिन्यांपासून कोपरगाव शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page