भारतीय जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद समता स्कूलकडे- संदीप कोयटे

भारतीय जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद समता स्कूलकडे- संदीप कोयटे

Samata School hosts Indian Jump Rope National Championships – Sandeep Koyte

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon26 Dec22 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या भारतीय जम्प रोप राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद समता इंटरनॅशनल स्कूल ला मिळाले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप  कोयटे यांनी  समताच्या स्व.मोहनलाल  झंवर सभागृहातील बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलताना दिली.

यावेळी बोलताना संदीप कोयटे म्हणाले
महाराष्ट्रात समता पॅटर्नने शैक्षणिक दृष्ट्या उंच भरारी घेतली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी यात  यशाची शिखरे गाठलेली आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही  विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे नेतृत्व केले असून त्यात करिअर ही केले आहे.
भारतीय जम्प रोप  राष्ट्रीय पातळीवरील  स्पर्धामुळे  देशातील खेळाडू कोपरगावात येऊन समताला भेट देणार आहे. 
     या बैठकीला भारतीय जम्प रोप असो.चे समन्वयक अशोक दुधारे, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे सरचिटणीस .दिपक निकम, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष .दिलीप घोडके, अहमनगर जिल्हयातील सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
    
 अशोक दुधारे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १४ वर्षाखालील मुले,मुली राष्ट्रीय फेडरेशन कप साठी आणि १७ वर्षाखालील मुले, मुलींमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत २७ राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहे. स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जम्प रोप असो.चे सरचिटणीस .शहजाद खान यांनी मान्यता दिली असून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील जम्प रोप असो.च्या बैठका आयोजित करण्यात येत आहे.
    

Leave a Reply

You cannot copy content of this page