कोपरगांव मनमाड महामार्ग : कामास सुरूवात मंत्री नितीन गडकरीं, स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद.

कोपरगांव मनमाड महामार्ग : कामास सुरूवात मंत्री नितीन गडकरीं, स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद.

Kopargaon Manmad Highway: Commencement of work Thanks to Minister Nitin Gadkari, Snehalata Kolhe.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue27 Dec22 , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव :  केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नामदार नितीन गडकरी यांनी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला नगर मनमाड महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली त्याबददल कोपरगांव मतदार संघातील रहिवासी तसेच वाहनधारकांच्यावतीने मंत्री नितीन गडकरी व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद दिले आहेत.

 नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था इतकी भीषण झाली होती की दिवसेंदिवस अनेकांचे अपघात होऊन मृत्य घडत होते,शालेय विद्यार्थी व नागरिक हकनाक या रस्त्याचे बळी होत असल्याचे चित्र दूर करण्यासाठी सदर महामार्ग केंद्राकडे हस्तांतरण झाला व कामाला गती मिळाली.केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर येथे ऑक्टोंबर २०२१ रोजी आले असता त्यावेळीह निवेदन देवुन नगर मनमाड महामार्गावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईबाबा शिर्डी देवस्थानासह अन्य विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटकीय महत्वाची स्थानावर खड्डेमुक्त रस्ता तयार करावा म्हणून मागणी केली होती,त्याआधीही सौ.स्नेहलता कोल्हे यांनी वारंवार सदर महामार्ग दुरुस्ती बाबत आग्रही मागणी केली होती यासह तालुका भाजपाच्यावतीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी रस्तारोको आंदोलनही केले होते. त्यावर त्यांनी सावळीविहीर कोपरगांव ते मनमाड या एन एच ७५२ जी राष्ट्रीय महामार्गाच्या १९१ कोटी रूपये खर्चास मान्यता देवुन त्यास केंद्र अंतर्गत निधीची उपलब्धता केली.
             
त्याचप्रमाणे दिवाळसणाच्या तोंडवर वाहतुकदारांना वाहने सुरळीत चालविता यावी यासाठी खडडे बुजवा म्हणून १३ ऑक्टोबर २०२२ भर पावसात ठिय्या आंदोलन केले होते. केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ता कामातील त्रुटींची पुर्तता करून सावळीविहीर कोपरगांव ते मनमाड एन एच ७५२ जो राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page