तहानलेले कोपरगाव; नेत्याइतकीच की जनता जबाबदार

तहानलेले कोपरगाव; नेत्याइतकीच की जनता जबाबदार

Thirsty Kopargaon; The people are as responsible as the leader

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed4 Jan23 , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: अजुनही शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही याला नेत्याइतकीच जनता जबाबदार आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय  चष्म्यातून पाहण्याची सवय लागल्यामुळे कोपरगावकरांवर ही परिस्थिती आलेली आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते प्रलंबित प्रश्नावर लक्ष न देता त्याचा पाठपुरावा न करता नवीन एखादी योजना किंवा प्रश्न मांडला तर त्यात त्रुटी काय आहेत खोडा कसा घालता येईल यावर आपली शक्ती खर्च करतात त्यामुळे  माहिती अधिकाराच्या अर्जाच्या नावाखाली आधीच काम करण्याची इच्छाशक्ती नसलेल्या अधिकाऱ्यांचे फावते मग काम रेंगाळले म्हणून समजा अशी कित्येक उदाहरणे देता येतील. समाजासाठी आपले दायित्व निभविण्याच्या ऐवजी समाजासाठी अडचणी निर्माण करण्याचाच प्रयत्न होतांना दिसतो. समाजापेक्षा चर्चा केवळ माझ्या नावाची झाली पाहिजे या प्रवृत्तीमुळे अनेक प्रश्न टप्प्यात असूनही प्रलंबित राहिले आहेत.  यावर कुणी विचार करायला तयार नाही. प्रश्नापेक्षा आंदोलन कोणी केले, कोणत्या गटाने केले, कोणत्या नेत्यांने केले,  याकडे पाहिले जात असल्यामुळे  पूर्वीप्रमाणे जनआंदोलन होत नाही निळवंडे चे पाणी संगमनेर शहराला पोहोचले.सर्व सोपास्कर पूर्ण झाल्यानंतरही  आपल्या दारात चार साडेचार वर्षांपूर्वी विनासायास फुकटात आलेले निळवंडेचे पाणी अंतरल्यासारखे झाले आहे. 
पुना मुंबई सह अनेक शहरांमध्ये  जिथून पाणी उपलब्ध आहे तिथून पाणी घेतले जात आहे परंतु कोपरगाव मध्येच दोन ठिकाणाहून पाणी येण्याची अनेकांना पोट दुखी झाली आहे तर काहींना साई संस्थान पैसे देत असल्याची पोट दुखी झाली आहे तिकडे सत्यसाईबाबा संस्थांनने अनेक गावात पाण्याच्या योजना केल्या आहेत. याकडे मात्र कुणी बघायला तयार नाही. समाजाचे भले व्हावे समाजाला न्याय मिळावा कारभार पारदर्शक व्हावा. यासाठी माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला परंतु दुधारी शस्त्र असलेल्या या कायद्याचा काही ठिकाणी  राजकीय दूस्वासापोटी समाज कल्याणासाठी होण्याऐवजी कामांना व विविध योजनांना खोडा  घालण्याचा जास्त प्रयत्न झाल्याचं दिसून येते. सगळ्यांचाच हेतू असा असेल असे नाही त्यांचा हेतू प्रामाणिकही असेल परंतु जर योजना आणि सरकारी कामे खोळंबत असेल असतील तर त्याचा काय उपयोग कारण कोणतीही योजना सहजासहजी मिळत नाही आणि ती योग्य कालावधी पूर्ण झाली नाही तर त्या योजनेचा लाभ मिळणे तर दूरच पण  राष्ट्रीय संपत्तीचे देखील आर्थिक नुकसानही होते  एक तर निधी परत जातो किंवा कामे तरी अर्धवट होतात अशी अनेक उदाहरणे कोपरगाव सह देता येतील ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा काही गैर व्यवहार असेल तर ज्यांनी केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे  परंतु ते काम किंवा ती योजना बंद पडता कामा नये  ते काम योजना पूर्ण होणे हे जनतेच्या हिताचे आहे आणि खऱ्या अर्थाने माहिती अधिकाराचा तोच हेतू आहे हे लक्षात घेतले पाहिजे.माहिती अधिकार, हा लोकांना सशक्त बनवण्यासाठी आणला गेला असला, त्याचा किस  काढण्याच्या प्रवृत्तीमुळे काही ठिकाणी   समाज व नागरिकांच्याच हितावर बेतणारी दुधारी तलवार ठरू पाहत आहे. यां ना त्या  कारणावरून योजना आणि  विकास कामे बंद पडत असतील तर माहिती अधिकाराचा अतिरेक रोखायलाच हवा
इंडिया बुल्सने साडेतीन टीएमसी पाणी उचलले कोपरगावकर गप्प, मागच्या वर्षी  १.५ टी एम सी पाणी येवल्याने पळविले  कोपरगाव गप्प, हातातोंडाशी आलेली निळवंडे ची योजना बारगळली कोपरगावकर गप्प, ४९ कोटीच्या पाणी योजनेची टेस्टिंग न होताच ठेकेदाराचे  फुलं  फायनल पेमेंट दिले  कोपरगावकर गप्प, दरमहिन्याला लिकेच्या दुरुस्तीच्या नावाखाली दोन लाख रुपये लुटले जातात  कोपरगावकर गप्प, पाणी शुद्धीकरण प्लांट साठी तीन लाख रुपये महिना खर्च होतो आणि  अशुद्ध गाळ मिश्रित पाणी येते  तरीही कोपरगावकर  गप्प,   निळवंडे च्या पाण्याला खो घातला कोपरगावकर गप्प, चार नंबर तलावाचे अर्धवट काम बंद पडले  निधी परत गेला कोपरगावकर गप्प पाच नंबर तलावाचे काम सुरू झाले माती मुरूम समृद्धी महामार्ग साठी वापरला  गेला  आता काम बंद कोपरगावकर गप्पच  सरकार बदलले काम बंद  पाच नंबर पाच नंबर साठवण तलाव झाल्यानंतर शहराचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचा  सुटणार असा कल्ला करणारे आता गप्प का?  
माझ्या मते जर खरंच  कोपरगाव शहराला शुद्ध स्वच्छ दररोज पाणी मिळावे असे वाटत असेल  मी तशी   कळकळ असेल तर  त्यांनी इंडिया  बुल्सने  पळविलेल्या साडेतीन टीएमसी  पाण्यावर येवल्याने पळविलेले १.५  टी एम सी पाणी परत मिळविण्यासाठी आंदोलन केले पाहिजे,  इकडे निळवंडे चे पाणी आम्हाला का मिळत नाही ? यासाठी आंदोलन केले पाहिजे, चार नंबर साठवण तलावाचा परत गेलेला निधी  मिळविण्यासाठी तसेच पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करण्यासाठी    संपूर्ण निधी  का मिळत नाही?  यासाठी आंदोलन केले पाहिजे,
पाणी मिळाले तरी  दररोज पाणी देण्यासाठी सक्षम अशी वितरण व्यवस्था नाही त्यासाठी निधीची मागणी केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्यांना कोपरगावकरांच्या पाण्याची काळजी आहे  असे म्हणावे लागेल अन्यथा बाकी सगळे केवळ श्रेय, राजकीय  दुस्वास, खोडा घालणे आणि दिखावा करणे असेच म्हणावे लागेल
 अशा परिस्थितीत कोपरगावकरांना कधी पाणी मिळणार याची शाश्वती नाही,  गेल्या दहा वर्षापासून कोपरगाव च्या पाण्याचे राजकारण बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या मध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थाने त्यांनीच कोपरगावचे पाणी गढूळ केले आहे.
कोणी म्हणायचे निळवंडे चे पाणी नको कोणी म्हणायचे निळवंडे चे पाणी शहराला आले तर शेतीचे पाणी जाईल कोणी कोर्टात गेले कोणाला  निळवंडेच  पाणी कोपरगावला आले तर लाभ क्षेत्रातील लोकांवर अन्याय होईल याची काळजी वाटत होती  कोणाला साईबाबांच्या पैशाची काळजी वाटत होती, कोणी म्हणायचे निळवंडे च्या पाण्याची गरज नाही पाचनंबर साठवण तलाव झाला की कोपरगावच्या पाणी प्रश्न सुटेल  खऱ्या अर्थाने अशा लोकांनीच  कोपरगावचे पाणी गढूळ केले आहे. त्यांच्यामुळेच निळवंडे चे पाणी आंतरले आणि आता  पाच नंबर साठवण तलावाचे कामही रखडले त्यांना कोणी आवर घालणार आहे की नाही  हा खरा प्रश्न आहे   संयमी आणि सोशिक  कोपरगाव ची जनता मात्र गप्प आहे आणि जोपर्यंत जनरेटा होत नाही जनक्षोभ होत नाही तोपर्यंत कोपरगाव शहराला नियमित दररोज  शुद्ध स्वच्छ  पाणी मिळणार नाही.  याला नेत्याइतकी जनता जबाबदार आहे हे ही तितकेच  सत्य !

Leave a Reply

You cannot copy content of this page