लाखो रुपयांची उधळपट्टी फिल्टर प्लांट ठेकेदारांवर मेहेर नजर कुणाची ? विवेक कोल्हे यांचा सवाल
Who is paying close attention to the extravagance of lakhs of rupees on the filter plant contractors? Question by Vivek Kolhe
मुख्याधिकाऱ्यांना अशुद्ध पाण्याचा आहेर; शुद्ध स्वच्छ पाण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा अल्टिमेटमHeadmasters are accused of impure water; January 26th Republic Day ultimatum for pure clean water
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed4 Jan23 , 17.40 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : फिल्टर प्लांटच्या ठेकेदारावर कुणाची मेहेर नजर आहे, लाखो रुपयांची उधळपट्टी त्यातून सुरू आहे, शहरवासीयांना शुद्ध पाण्याऐवजी गाळ मिश्रित अशुद्ध पाणी पुरवले जाते., जोपर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची बिले देण्यात येऊ नये असा स्पष्ट इशारा जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी मंगळवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकारणात झालेल्या बैठकीत दिला.
कोपरगाव शहराच्या गढूळ गाळ मिश्रित पाण्यामुळे अबाल वृद्धासह रोगराईचे प्रमाण वाढले असून येत्या २६ जानेवारीच्या आत स्वच्छ शुद्ध पाणी न दिल्यास उपोषण करणार असल्याचा अल्टिमेटम विवेक कोल्हे यांनी यावेळी दिला.
कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्या संदर्भात व प्रलंबित असणाऱ्या नागरी सुविधांबाबत जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या दालनात मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी कोल्हे यांनी शहरवासीयांच्या अनेक समस्यांचा भडीमार विवेक कोल्हे यांनी मुख्याधिकारावर केला त्यात ते निरूत्त्तर झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गोरगरीब शहरवासीय त्यांचे प्रलंबित प्रश्न पालिका कार्यालयात घेऊन येतात मात्र मुख्यiधिकारी कधीच त्यांच्या दालनात उपस्थित नसतात ते संध्याकाळी सहा नंतर कार्यालयात येतात अशा असंख्य तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या त्यावर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरात सध्या रस्त्यांसह अन्य विकास कामे होत आहे मात्र त्याचा दर्जा बेसुमार आहे. नागरिकांचे पैशाची उधळपट्टी सुरू आहे, प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहेत, जनतेला वेठीस धरून त्रास देण्याचे धोरण सध्या सुरू आहे, त्याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे काय?
रस्त्याच्या खड्डेदुरुस्ती ठेक्यात काढल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांबाबतीत गंभीर भूमिका घेण्याची मागणी केली. या समस्या व मागण्यावर जर येत्या २६ जानेवारीच्या आत कार्यवाही करून सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विवेक कोल्हे यांनी शेवटी दिला.
चौकट
शहराच्या विविध भागातील रहिवासी नागरिकांनी नळाला येणाऱ्या अशुद्ध पाण्याचा आहेर मुख्याधिकाऱ्यांना देत हे पाणी पिऊन दाखवण्याची गळ असंख्य नागरिकांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना घातली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा धाक आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी असंख्य नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली.
Post Views:
373





