निराशेतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा टोकाचा निर्णय ही गोष्ट चिंताजनक – स्नेहलता कोल्हे

निराशेतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा टोकाचा निर्णय ही गोष्ट चिंताजनक – स्नेहलता कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे

TLC Mismatch मुळे कर्जदार शेतकऱ्यावर आत्मदहनाची पाळी

वृत्तवेध ऑनलाईन 25 July 2020
By: Rajendra Salkar

कोपरगाव: तांत्रिक कारणामुळे किंवा
TLC Mismatch बँकेच्या चुकीमुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असतील, व या निराशेतून त्याला आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असेल, तर ही गोष्ट चिंताजनक असून सदर शेतकऱ्यांला कर्जमाफी पासून वंचित ठेवणाऱ्यांची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव तथा मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

सौ. कोल्हे म्हणाल्या, आज न उद्या माझी कर्जमाफी होईल या आशेवर असलेल्या शेतकरी हंगामाच्या तयारीसाठी लागलेला आहे. एकतर कर्जमाफी होत नाही, बँक पिक कर्ज देत नाही, अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकरी काय करावे, असा अशा विवंचनेत सापडलेला आहे. तरी मायबाप सरकारने

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (गुगल इमेज)

श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्ज या योजनेचा पैसा तात्काळ देऊन शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे, असेही सौ कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यात महाराष्ट्र शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्ज योजनेचं लाभापासुन वंचित तळेगाव मळे येथील पोपट गंगाधर वाकचौरे या शेतक-याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पोपट गंगाधर वाकचौरे यांनी कोपरगाव ग्रामीण, बँक आँफ महाराष्ट्र शाखा दहिगाव बोलका येथून सन २०१३ साली ८० हजार रुपयांचे घेतलेले कर्ज थकबाकीत गेल्याने तत्कालीन सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत त्यांनी दि.२१ आॅगस्ट २०१७ रोजी आँनलाईन अर्ज भरला परंतू या पात्र शेतकऱ्याला बँकेचा व सोसायटीच्या गलथान कारभारामुळे अद्याप कर्जमाफीची रक्कम मिळाली नसल्याचा संतापाजनक प्रकार समोर आला आहे.

यावर बँकेने दिलेल्या पत्रात कर्जदाराने आँनलाईन कर्जमाफी अर्ज भरताना चुकीचा खाते नंबर टाकला असल्याचे व तो दुरूस्त करून शासनास पाठविला असल्याचे सांगितले परंतू शासनाकडून आजतागायत कर्जमाफीची रक्कम बँकेस मिळाली नसल्याने सांगितले आहे. हा सर्व पत्रव्यवहार वाकचौरे यांनी निवेदनाच्या सोबत जोडला आहे तरीही शासनाने निर्णय न घेतल्यास १५ आँगष्ट रोजी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागण्याचा इशारा दिला असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यासह संबंधितांना पाठवलेल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page