शासकीय योजना आपल्या दारी’ योजनेचा लाभ घ्या- आ. आशुतोष काळे
Govt Scheme Take advantage of your Dari’ Yojana- Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 2Feb23 , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नागरिकांसाठी कोपरगाव शहरात ‘शासकीय योजना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा कोपरगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
विधवा महिला, अपंग नागरिक व वृद्ध नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेंशन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व /अपंग पेंशन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक दाखले लाभार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी शनिवारी (दि.०४) रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत सुभाषनगर येथील श्री लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी ‘शासकीय योजना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. श्री पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले असून काही दिवसानंतर हा असा उपक्रम ग्रामीण भागातही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.