समता स्कूलचे विद्यार्थी भविष्यात माणिक रत्नाप्रमाणे चमकतील – सौ स्वाती कोयटे
Students of Samata School will shine like rubies in the future – Mrs. Swati Koyte
सफायर बॅचच्या विद्यार्थ्यांना निरोप Farewell to Sapphire Batch Students
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 19.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मिळालेल्या ज्ञान, शिस्त, संस्कार या शिदोरीवर समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी भविष्यात माणिक रत्नाप्रमाणे चमकून स्वतःबरोबर स्कूलचे नाव उज्वल करतील असा आशावाद समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांनी दहावीच्या सफायर बॅचच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थिनी स्वरूपा दास व विद्यार्थी अथर्व बेरगळ यांनी आपल्या मनोगतात स्कूलचे संस्थापक काका कोयटे, सौ.स्वाती कोयटे, .संदीप कोयटे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मिळालेले ज्ञानाचे धडे हे न विसरण्यासारखे आहे. यांच्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश संपादन करून आमचं उज्वल भविष्य घडवणार आहोत.
उपप्राचार्य समीर अत्तार म्हणाले की, सफायर बॅचमधील विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातील, त्या क्षेत्रात स्वतःचे उज्वल भविष्य घडवतील.
या बॅच मधील विद्यार्थ्यांनी ज्ञान, कला, क्रीडा क्षेत्रात केलेल्या उज्वल कामगिरीबद्दल त्यांचा सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बॅच मधील विद्यार्थ्यांनी गीत व नृत्यातून समता इंटरनॅशनल स्कूल विषयीच्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक आकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन शिक्षिका सौ.शोभा गढरी यांनी केले. या कार्यक्रमाला प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी त्यांचे पालक समता स्कूलचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार शिक्षिका सौ.रोहिणी वक्ते यांनी मानले.
Post Views:
143