कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने शिवजयंती उत्सव –शैलेश साबळे

कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने शिवजयंती उत्सव –शैलेश साबळे

Shiv Jayanti Celebration on behalf of Kopargaon City NCP – Shailesh Sable

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed15 Feb23 , 17.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगावहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवार (दि.१९) रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष शैलेश साबळे यांनी दिली आहे.

शैलेश साबळे यांनी सांगितले की, तीन कोपरगाव शहरात शिवजयंती निमित्त रविवारी सकाळी ९.०० वाजता मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.हि रॅली जब्रेश्वर मंदिरापासून सुरु होवून गांधीनगर, मार्केट यार्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. या रॅलीत महिला पुरुष‎ व शिवप्रेमी युवक युवतींनी मोठ्या संख्येने‎ सहभागी व्हावे असे आवाहन‎ शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष शैलेश साबळे यांनी केले आहे.

                      

Leave a Reply

You cannot copy content of this page