गाडीचा टायर फुटला, ड्रायव्हरचा तोल सुटला, २ जण ठार, कारचा चेंदामेंदा
Car tire burst, driver lost balance, 2 killed, car wrecked
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir17 Feb23 , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव – नागपूर मुंबई हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूर कडून नाशिककडे जाणाऱ्या कारचे डाव्या बाजूचा समोरचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या महिलेचा खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेतअपघात इतका भयानक होता की गाडी मधील एअर बॅग उघडूनही दोन जणांना आपला जीव गमवावा लागला
शुक्रवारी (१७) दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात एक मारुती सुझुकी कंपनीची ब्रेजा कार क्र.एम एच ४९ बीबी ६६२०ही कार भरधाव वेगाने नागपूर वरून नाशिककडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील कोकणठाण शिवारात डाव्या बाजूचा समोरील टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली ती कार दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दोन्ही एअर बॅग उघडले तरी या अपघातात राजेश रहाटे (५२) यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या अलका वझुलकर (४२) यांचा खाजगी रुग्णालया मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून लीना राजेश रहाटे (१८) व अवंतिका वझुलकर (१६) या दोन तरूणी जखमी असून त्यांच्यावर कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समृद्धी महामार्ग खुला झाल्यापासून अनेक अपघात या महामार्गावर घडले आहे. दोन दिवसांपूर्वी कोपरगावच्या शिर्डी इंटरचेंजजवळ एक भरधाव कार संरक्षण कठड्यावर चढली होती या अपघातात वाहनात असलेला चालक बालंबाल बचावला होता. अपघातांची मालिका पाहता रस्ता चांगला असला तरी चालकांनी वेगाचे भान ठेवले पाहिजे असेच म्हणावे लागेल
दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका आणि एमएसएफचे जवान मदतीसाठी पोहोचले. यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.





