श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम नव्हे जोरदार धारा
Shravanat Ghan Neela Barasala,
सुरेगाव मंडळ ४ इंच १९ मिलिमीटर तर कोपरगावला २ इंच ५ मिलीमीटर पाऊस ,
गोदावरी नदी वाहती ओढे-नाले खळाळून वाहू लागले
कोपरगाव : गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव परिसरात काही भागात त्याच्या विजेच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह कमी अधिक तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. तालुक्याच्या सुरेगाव मंडळ परिसरात ११९ मिली मीटर म्हणजे ४ इंच १९ मिलिमीटर त्याखालोखाल दहेगाव बोलका मंडळात ७३ मिलिमीटर म्हणजे जवळपास तीन इंच कोपरगाव मंडळात ५५ मिलिमीटर म्हणजे २ इंच पाच मिलिमीटर तर रवंदे मंडलात सर्वात कमी ३८ म्हणजे १ इंच १३ मिलिमीटर पाऊस पडल्याच्या नोंदी झाले आहेत अशी माहिती महसूल प्रशासनाचे अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली तर जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्रावर ६० मिलिमीटर म्हणजे २ इंच १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती प्रभारी हवामान निरीक्षक चेतन परहे यांनी दिली. नाशिक जिल्ह्याच्या धरण परिक्षेत्रात तसेच घोटी, इगतपुरी नाशिक, नांदूर मध्यमेश्वर परिसरातही पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्याने गोदावरी नदीला गुरुवारी ४०४ क्यूसेक्स पाणी दारणा, गंगापूर धरणातून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात सोडण्यात आले, यापूर्वी ४, १४ जून व २९ जून रोजी गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले होते. जेऊर कुंभारी सरिता मापन केंद्रात गुरुवारी ६६ मिली मिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता पडलेल्या पावसाने थोडासा गारवा निर्माण झाला सखल भागात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे शहरातील रस्ते गटारी स्वच्छ धुऊन गेल्या संततधार पाऊस आणि काहींची घरे शेजवली ज्यांची इमारतींची स्लॅप ची कामे सुरू आहेत त्यांना पावसाचे चांगल्या प्रकारे पाणी मिळाले गेले गुरूवारी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर कंसातील आकडे आजपर्यंत एकूण मिलिमीटरमध्ये आहे. दारणा १३ (३८४) गंगापूर o (६८७), कडवा २५ (४११) काश्यपी ० (३३६) भावली ६०(१४५३) वालदेवी ७ (२५४), गौतमी ४३ (३९०), वाकी ७७ (८१५) नांदूर मधमेश्वर ५१ (३७६) त्र्यंबकेश्वर ३ (३७७), घोटी ३८ (६६४), इगतपुरी ६२ (१४०४), देवगाव २० (३७०), ब्राह्मणगाव ४८ (४०२),कोपरगाव ५० (४७२), पडेगाव ५० (३७१) सोमठाणे २२ (३७७), कोळगाव ८ (२३०), शिर्डी ३६ (२९४), सोने वाडी २६ (२३०), रांजणगाव ४८ (४३३), चितळी ६४ (३७२), राहता ५६ (४९०) या प्रमाणे पाऊस पडला असून त्याच्या नोंदी पाटबंधारे विभागाने केल्या आहेत.
कोपरगांव तालुक्यातील डाऊच बु।। येथे वीज कोसळली आहे…सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी नाही.. असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
दरम्यान अतिवृष्टी झालेल्या भागातील पिकांचे त्वरीत पंचनामे करावेत म्हणून विद्यमान आमदार व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मागणी केली आहे.





