नागपंचमीवर कोरोनाचा फणा !

नागपंचमीवर कोरोनाचा फणा !

उंच माझा झोका झुललाच नाही की,नागही पुजला नाही,

कोरोनाचा अजब खेळ, सण- उत्सवाचा झाला बट्ट्याबोळ !

वृत्तवेध ऑनलाईन 26 July  2020

By : Rajendra Salkar 

कोपरगाव :श्रावणातील एक अस्सल ग्रामीण मराठमोळा सण म्हणजे नागपंचमी. लहान गावात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील हा सण वेगळ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमी हल्ली तशी कमी प्रमाणात साजरी केली जाते आहे. नागपंचमीही आता पूर्वीसारखी साजरी होत नाही. यंदा कोरोनामुळे बंधने आल्याने , नागपंचमीचा झोका उंच आकाशी गेलाच नाही कि,

सुवासिनींनी वारूळातील नागही पुजला नाही.

भारतीय परंपरेनुसार दर महिन्याला कुठला तरी सण असतोच असतो; पण महाराष्ट्राचा विचार करता श्रावण महिन्याला सणांचा राजाच म्हणावा लागेल.प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर,श्रावणातील सोमवारांचे शिवभक्तांना असलेले महत्त्व, नागपंचमी,रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी,आणि शेवटी येणारा बैलपोळा व पिठोरी अमावास्या अशी सणांची रेलचेल तर असतेच,पण पाऊस पडत असल्याने हिरवागार झालेला निसर्गही सणाचा आनंद द्विगुणित करत असतो.

अशा या हसर्‍या, लाजर्‍या श्रावणातील एक अस्सल ग्रामीण मराठमोळा सण म्हणजे नागपंचमी. लहान गावात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील हा सण वेगळ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमी हल्ली तशी कमी प्रमाणात साजरी केली जाते आहे. नागपंचमीही आता पूर्वीसारखी साजरी होत नाही. यंदा कोरोनामुळे बंधने आल्याने कोपरगाव तालुक्यात व परिसरात सुना सुना गेला कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे बहुतांशी परिसरात शुकशुकाट होता महिला वर्गाचा मोठा हिरमोड झाला नागपंचमी म्हणजे केवळ नागाची पुजाच नव्हे तर,नागपंचमीला सासुरवाशीण मुली माहेरला येतात, आपल्या मैत्रिणी सोबत झोके खेळणे, झिम्मा, फुगड्या खेळणे, वारुळाला जाणे, गाणे म्हणणे, असे कितीतरी प्रकार दरवर्षी आनंदात होत असत, मात्र यावर्षी की धूमधाम पूर्णपणे थांबलेली दिसत होती निंबाच्या झाडाला मोठा झोका बांधायचा व त्यावर दोघींनी किंवा एकीने मनसोक्त झोके खेळायचे, प्रत्येक मोठ्या झोक्याचे ठिकाणी जेरी लावून पाच पाच झोके झुलायचे, खेळायचे खूप झुंबड -गर्दी झोका खेळण्यासाठी व्ह्यायची खूप मजाच -मजा असायची परंतु यावर्षी ” कोरोना ” मुळे कुठेही झोका नाही, वारूळ पूजन, सर्प पूजन, झिम्मा -फुगड्या कोठेच काही नाही, महिलांचे नटने थटने दिसले नाही, काही दारांपुढे तर नागपंचमी च्या नागाच्या रांगोळ्या पण नाही, एवढी उदासीनता, व भयानकता या कोरोनाने आणली आहे, या वर्षी पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात पडत आहे श्रावणात निसर्ग भले, फुलला परंतु त्या निसर्गाच्या आनंदात भर घालणाऱ्या बाबी कोरोनाने हिसकावून हिरावून घेतल्या ,

 

वारे कोरोना तुझा खेळ;, तू आणली आमच्यावर ही वेळ,असेच म्हणण्याची वेळ प्रत्येकावर आली अनेकांनी आपापल्या घरी उकडीचे पुरणाचे दिंड उकडीचे पदार्थ करून खाल्ले,

पूर्वी नागपंचमीच्या महिनाभर अगोदर रात्री गावातील महिला व मुली एकत्र जमून फेर धरीत. सामुदायिक गाणी गात असत. गाण्यातून रामायण, महाभारत, विठ्ठल-रुक्मिणी, सासुरवाशिणींचे प्रश्न यावर आधारित लोकगीते गायली जायची. झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळले जायचे. हल्ली घरोघरी टीव्ही आल्याने अशा गोष्टी जवळपास बंद होत आल्या आहेत.

या सणाला बर्‍याच ठिकाणी अजूनही नवविवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येण्याची पद्धती रूढ आहे. परंतु कोरोनामुळे जिल्हाबंदी, कन्टोनमेंट झोन यामुळे सर्वत्र बंद झाले आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेतात .पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग रूढ झालेली दिसते. कोरोनामुळे वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे लागत असल्याने मेहंदी लावण्याचा उत्साह दिसून आला नाही.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नाग नरसोबा चित्र आणून नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.

आपल्या पूर्वजांनी मोठ्या कल्पकतेने जीवनाच्या रहाडगाड्यातून माणसाच्या शरीराला, मनाला विश्रांती मिळावी, पुन्हा नव्या जोमाने, उमेदीने उभा रहावा यासाठी माणसाच्या जीवनात उल्हास, उत्साह, आनंद असे नवे नवे रंग भरणारे निसर्गाशी समरूप असलेले त्याला सांस्कृतिक, सार्वजनिक अशी सांगड घालून धार्मिकतेचा मुलामा चढवून सणांची निर्मिती केली. नव्या जीवनपद्धतीमुळे सणांचे महत्त्व कमी होत असले तरी, गावखेड्यात आजही तो ऊत्साह दिसून येतो. आज कोरोनाचे संकट आहे. म्हणून ठीक आहे. पण हे सण असेच भंग होत राहिले, तर माणसांचे आयुष्य बेरंग होऊन जाईल ! कोरोनाचा अजब खेळ, सण- उत्सवाचा झाला बट्ट्याबोळ

काळाच्या ओघात गाव सुटलं, माणसं तुटली. श्रावणात झोके बांधायची झाडं हरवली. संसाराचा झोला झुलवता झुलवताच जीव अर्धामुर्धा होतो. पण आजही घरात सण व्रत-वैकल्य याची लगबग सुरू झाली की मन आपोआपच गावातल्या झोक्यावर जाऊन हिंदोळ्या घेते.

चौकट
नागपंचमीचा उत्साह नाही,कोठे झोके नाही, सर्वीकडे भीती, या वर्षी नागपंचमी या सणावर कोरोना चे सावट आले आहे. आधीच कोरोनामुळे कुठली हौस मौज नाही लगबग नाही धूम धडाका नाही गाजावाजा नाही घाबरत घाबरत पन्नास लोकांच्या साक्षीने आशीर्वादाने आले कार्यक्रमाला फाटा देत लग्न करून गेलेल्या कित्येक मुलींना या पहिल्या सणाला माहेरी आता येता आले नाही ज्या आल्या त्यांना घरात साध्या पद्धतीत साजरा करावा लागला काही मुलीं सासरीच पहिल्यांदाच नागपंचमी सण साध्या पध्दतीने साजरा केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page