“दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी पंखे; सेवा हाच आमचा धर्म!” – रेणुका कोल्हे

“दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी पंखे; सेवा हाच आमचा धर्म!” – रेणुका कोल्हे

“New Wings of Self-Reliance for the Differently-Abled; Service Is Our Only Religion!” – Renuka Kolhe

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम; कृत्रिम अवयव वाटपातून शेकडो कुटुंबांना आधार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 22Sun.18.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : “समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. दिव्यांग बंधू-भगिनींना केवळ मदत नव्हे, तर स्वावलंबनाची ताकद देणे हा आमचा ध्यास आहे,”असा ठाम विश्वास संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुका कोल्हे यांनी व्यक्त केला.

संजीवनी युवा प्रतिष्ठान व पुणे येथील साधू वासवानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि.२२ मार्च रोजी  दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले असून कोपरगाव मतदारसंघात हा उपक्रम समाजसेवेचा नवा आदर्श ठरत आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम अवयवांसह आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या आयुष्यात नवे बळ निर्माण करण्यात आले.

रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या की, “सेवा हाच धर्म” हा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा मूलमंत्र अंगीकारत विवेक कोल्हे समाजासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. दिव्यांगांना मदत करताना केवळ वस्तू देणे हा उद्देश नसून त्यांच्या आयुष्याला आधार देणे आणि कुटुंबांना नवसंजीवनी देणे हा खरा हेतू आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरमहा दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देणे, त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करणे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. “अपंगत्व असले तरी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारा, आत्मविश्वासाने जगा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या उपक्रमामुळे कोपरगावसह परिसरातील अनेक दिव्यांगांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली असून समाजसेवेचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा ठरत आहे.

चौकट :

सेवा सप्ताहातून समाजसेवेची परंपरा जिवंत

१६ मार्च रोजी स्व. शंकरराव कोल्हे यांची पुण्यतिथी, तर २४ मार्चला जयंती प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते. या दरम्यानचा सात दिवसांचा ‘सेवा सप्ताह’ विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. “कोल्हे साहेबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन सौ. रेणुका कोल्हे यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page