कोपरगाव मतदार संघाचा खरा विकास स्नेहलता कोल्हे यांच्या काळातच – वाल्मीक भोकरे
The real development of Kopargaon Constituency was during the time of Snehalata Kolhe – Valmik Bhokare
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun16 July24,18.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील पाणी, वीज, रस्ते, पाटपाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी सुविधासह खऱ्या अर्थाने विकास माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या काळातच झाला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वाल्मीक भोकरे यांनी कासली येथील टिफिन पे चर्चा या कार्यक्रमात केले
भाजपचे मोदी जनसंपर्क अभियानांतर्गत कासली (शिरसगाव) येथे रविवारी (१६ जुलै) शिवाजीराव जाधव यांच्या वस्तीवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ‘टिफिन पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत नागरिकांना मोफत उपचार, रस्ते, पाणी, वैद्यकीय, शिक्षणाच्या पायाभूत सुविधा, बेरोजगारांना रोजगार, महामार्ग व विमानतळांचा विकास अशी अनेक लोककल्याणकारी कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात काशी विश्वनाथ कॉरिडॉर विकसित झाले आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर, काशी विश्वनाथ व उज्जैन येथील महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम, श्री सोमनाथ व केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे मोठे काम तसेच भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग, ज्ञान, विज्ञान, पर्यावरण, अध्यात्म, वसुधैव कुटुंबकम आणि विश्वकल्याणाचा संदेश जगाला दिला आहे. अमेरिका, इंग्लंडसह जगातील १५० देशांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाचे कौतुक केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या विविध विकास योजनांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच पक्ष बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.
तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी केशवराव भवर, ज्ञानेश्वर परजणे, प्रकाश शिंदे, सुदामराव कर्पे, शिवाजीराव जाधव, गोविंदराव मलिक, अंबादास पाटोळे, अशोकराव शिंदे, संजय पठाडे, किसनराव गव्हाळे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश भिंगारे, दत्तात्रय मलिक, बाबासाहेब भिंगारे, मनोज तुपे, दत्तात्रय हेगडमल, विष्णू बोळीज, शिवाजी गायकवाड, अंकुश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, बबन गायकवाड, रवींद्र गायकवाड, रविकांत भवर, रोहित मढवे, ऋषिकेश जाधव, सीताराम गोरे, कैलास जामदार, बाळासाहेब भिंगारे, केशव गायकवाड, ज्ञानदेव गायके, दत्तात्रय पाटोळे, हरिभाऊ गव्हाळे, अशोक पठाडे, सुदाम गायकवाड, बबन साळुंके, नवनाथ मरकड, अरविंद लंके, अभिजित बोडखे, रतन मलिक, हर्षदाताई जाधव, जयश्रीताई मढवे, पुष्पाताई बोजगे, शीतल गायकवाड, ज्योती महाले, वंदना मच्छिंद्र जाधव, वंदना गोकुळ जाधव, निर्मला शिवाजी जाधव आदींसह सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच कासली, शिरसगाव, संवत्सर, दहेगाव (बोलका), पढेगाव व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या कामांना उजाळा देताना भाजपचे माजी खासदार सूर्यभान पाटील वहाडणे, विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे, माजी खासदार भीमराव बडदे यांच्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घरोघरी भाजपचे ‘कमळ’ हे चिन्ह पोहोचवून भाजप वाढविण्याचे मोठे काम केले आहे. – वाल्मीक भोकरे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष.
Post Views:
180