कोपरगाव : संदिप वर्पे सुप्रिया सुळे यांच्या बैठकीस हजर; फोटो व्हायरल चर्चांना उधाण
Kopargaon: Sandeep Varpe attended the meeting of Supriya Sule; Photo sparks viral discussions
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun16 July24,16.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगावातील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे शरद पवार की अजित पवार नेमके कोणत्या गटाचे आहेत, हे स्पष्ट होत नव्हते. परंतु शनिवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या बैठकीत संदिप वर्पे उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने वर्पे कोणत्या गटाचे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे .
राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. परदेश दौऱ्यावर असलेले आमदार आशुतोष काळे यांनी आल्यानंतर मतदार संघाच्या विकासासाठी बुधवारी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे हे कोपरगाव येथील आमदार काळे गटाचे प्रवक्ते असले तरी शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुंबईत झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरद पवार व अजित पवार असे दोन गट झाले यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याने संदीप वर्पे काय भूमिका घेतात याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागलेले होते संदीप वर्पे आमदार आशुतोष काळे यांच्या बरोबर राहतात की शरद पवार यांच्याबरोबर जातात याची गेल्या दोन दिवसापासून दबक्या आवाजात चर्चा कोपरगावात सुरू होती मात्र शनिवारी मुंबईत राष्ट्रीयकार्याध्यक्ष सुप्रिया सुळे,यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदार रोहित पवार, प्रवक्ते महेश तपासे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यभरातील आजी-माजी युवक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संदीप वर्पे उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असले तरी दुसरीकडे गेले दोन दिवसापासून वर्पे कुठे जाणार यावरून सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे
चौकट
शरद पवार आणि अजित पवार याबाबत आपली भूमिका काय आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारी मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संदीप वर्पे उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने सुरू असलेल्या चर्चेतील हवाच निघून गेली
Post Views:
420