चासनळीच्या ‘त्या’ डॉक्टरवर कठोर कारवाई करा-  संजीवनी युवा प्रतिष्ठान 

चासनळीच्या ‘त्या’ डॉक्टरवर कठोर कारवाई करा-  संजीवनी युवा प्रतिष्ठान 

Take strict action against ‘that’ doctor of Chasnali- Sanjeevani Yuva Pratishthan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10Aug24,10.20Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या वेळी डॉक्टर हजर नसल्यामुळे एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू ही घटना निषेधार्थ असून  संबंधित डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे निवेदन अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने तहसीलदार संदीप भोसले यांना  बुधवारी (९ ऑगस्ट) दिले. 

 यावेळी  युवा सेवक सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, पंकज कुऱ्हे, सागर राऊत, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, वैभव सोळसे, समाधान कुऱ्हे, साहिल जाधव, कुणाल आमले, वासुदेव शिंदे, सुमित खरात, बाळासाहेब पानगव्हाणे, बापू गाडे, योगेश वाघ, रितेश परजणे आदी उपस्थित होते.
 कोपरगाव तालुक्यातील मौजे चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.  या आरोग्य त्या महिलेच्या प्रसूतीवेळी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने त्या महिलेला हकनाक आपले प्राण गमवावे लागले. ही घटना केवळ संतापजनकव   अत्यंत लाजीरवाणी आहे.   त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी. 
चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेसाठी डिझेल उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी रुग्णावर वैद्यकीय उपचार करण्याकडे दुर्लक्ष करतात. दिवंगत महिलेच्या बालकाचे भवितव्य मातेअभावी अंध:कारमय बनले आहे   आरोग्य विभागाचा गलथानपणा, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष यामुळे असे प्रकार घडत असून, ही बाब चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
चौकट…  आपत्कालीन परिस्थितीत व संकटकाळात जर कुणाला वैद्यकीय उपचार किंवा इतर प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हेल्पलाईन नंबर ८१८१९०९०९० वर संपर्क साधावा, 
–  युवा सेवक सिद्धार्थ साठे  

Leave a Reply

You cannot copy content of this page