निष्ठावंत शिवसैनिक हिच पक्षप्रमुखांची खरी ताकद – उदय दळवी 

निष्ठावंत शिवसैनिक हिच पक्षप्रमुखांची खरी ताकद – उदय दळवी 

Loyal Shiv Sainiks are the real strength of the party chief – Uday Dalvi

गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत  मेळावाGather under the campaign “Village, Branch, House, Shiv Sainik”.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir11Aug24,18.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आज संपूर्ण देशातील यंत्रणेचा वापर महाराष्ट्रातील राजकारणाला बिहार करण्यासाठी वापरला जात असून पक्षप्रमुख उद्धव  व शिवसेना पक्षापुढे अडचणी उभ्या करून पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही आव्हाने संकटे उभे केले तरी महाराष्ट्रातील प्रामाणिक शिवसैनिक ढाल बनून पक्षप्रमुखांसमोर उभा असून शिवसैनिक हीच पक्षप्रमुखांची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे  संपर्कप्रमुख उदय दळवी यांनी कोपरगाव येथे बुधवारी  (९ऑ) रोजी हॉटेल विरा पॅलेस येथील पदाधिकारी व शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना केले. 

गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख सनी वाघ, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, जिल्हा संघटक सपना मोरे, भैया तिवारी, गिरीधर पवार, प्रवीण शिंदे, राहुल होन, मुन्ना मंसुरी, महेश कुलकर्णी, उल्हास आवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोपरगाव दक्षिण भागाकरिता शैलेश खालकर यांचे उपतालुका प्रमुख तसेच बाळासाहेब वाकळे विभाग प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासून भाजपाने अंतर्गत कूटनीती वापरून शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी अनेक कारस्थाने केली. मात्र सामान्य जनतेच्या जोरावर शिवसैनिकांच्या  कष्टावर शिवसेना आजही ताकदीने उभी आहे. जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी कोपरगावत फक्त राजकारणात श्रेय मिळवण्यासाठी पोस्टर युद्ध सुरू आहे. 50 वर्षापासून रखडलेले पाणी प्रश्न, बाजारपेठ, बेरोजगारी, सामान्य जनतेच्या प्रश्न प्रलंबित असून शिवसेनेची प्रत्येक शाखा तळागाळापर्यंत जाऊन सामान्य जनतेसाठी काम करील असा आशावाद व्यक्त केला. शहर प्रमुख सनी वाघ यांनी शहरातील प्रत्येक विभागात वार्डात शाखा सुरू होत असून शहरातील नागरिकांनी आपल्या अडचणी शाखेत मांडाव्यात, नागरिकांना प्रत्येक प्रश्नात आमचा शिवसैनिक सदैव साथ देईल असे सांगितले. तालुकाप्रमुख ठाकरे यांनी 40 वर्षापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शेकडो शिवसैनिक आजही शिवसैनिकच असून कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करणारा कार्यकर्ता हा शिवसेनेतच घडतो. भविष्यात गावागावात जाऊन शेतकरी, जनतेचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम केले जाईल असे सांगितले. आभार संजय दंडवते यांनी मांडले. यावेळी रंगनाथ गव्हाणे, धर्मा जावळे, विजय ताजणे, चंद्रकांत भिंगारे, शिवाजीराव रोहमारे, कृष्णा अहिरे, बालाजी गोरडे, राजेंद्र नाजगड, किरण राहणे, भाऊ पाटील थोरात, नवनाथ खालकर, गोरख वाकचौरे, अण्णा कोल्हे, पप्पू कोल्हे, रवींद्र देवकर, रामदास मलिक, सचिन आसणे, विलास गव्हाणे, काशिनाथ गव्हाणे, सुभाष गोरडे, बाबुराव गव्हाणे, सागर जगताप, दत्ता वलटे, रविंद्र जेजुरकर, सागर फडे, सिद्धार्थ शेळके, अशोक मुरडणार, असे बहुसंख्य शाखाप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page