मराठाआंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध, कारवाई करा, आरक्षण द्या- अशोक काळे
Protest against inhuman lathi-charge on Maratha protesters, take action, give reservation- Ashok Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 4Sep24,20.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीहल्ला हि अत्यंत दुर्दैवी व दु:खद घटना असून या घटनेचा कोपरगाव मतदार संघातील तमाम जनतेच्या वतीने निषेध करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार अशोक काळे यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून सकल मराठा समाजाच्यावतीने कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय दिवसभर शंभर टक्के बंद ठेवून पाठिंबा दिला. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आमदार अशोक काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष सनी वाघ, मनसेचे शहराध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरवके, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ. स्वप्नजा वाबळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, प्रशांत वाबळे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, अॅड. योगेश खालकर, विशाल निकम, शुभम लासुरे, प्रदीप कुऱ्हाडे, अक्षय आंग्रे, सचिन गवारे, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव, मनोज नरोडे, कलविंदरसिंग डडीयाल, मुकुंद इंगळे, ठकाजी लासुरे, योगेश नरोडे, राजेंद्र आभाळे, जनार्दन शिंदे, सोमेश शिंदे, दिनेश गाडेकर, कुंदन मराठे, संकेत पारखे, कार्तिक गोर्डे, रुपेश वाकचौरे, संदीप सावतडकर, बाळासाहेब शिंदे, आनंद डिके, अनिरुद्ध काळे आदींसह कोपरगाव शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.