२८ कोटीच्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू- आ.आशुतोष काळे
28 Crore civil court building work started – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 10Sep24, 18.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या २८.२१ कोटीच्या दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर)इमारतीचे काम सुरू झाल्याचे समाधान आहे असल्याचे सांगून आ आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
अनेक शासकीय इमारती माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात उभ्या केल्या असून त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा देखील समावेश होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयश्री प्राप्त केल्यानंतर बार असोसिएशनच्या सदस्यांनी सत्कार करून दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मुदतबाह्य झाल्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला असतांना देखील या ठिकाणी न्यायालयीन कामकाज करतांना येणाऱ्या अडचणींची जाणीव झाली होती. त्याच वेळी दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी निधी देईल असा शब्द बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी दिवाणी न्यायालय इमारत मुख्य अजेंड्यावर घेवून या इमारतीसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे या दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी २८.२१ कोटी निधी मिळविण्यात मला यश मिळाले. रविवार (दि.१०) पासून न्यायालयाच्या इमारतीच्या कामास प्रारंभ होत आहे याचे आत्मिक समाधान मिळत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
आ.आशुतोष काळेंकडून बार असोसिएशनच्या मागणीला न्याय
चौकट :- दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी २८.२१ कोटी निधी देवून आमच्या मागणीला न्याय दिल्यामुळे इमारतीच्या कामास प्रारंभ होत असून बार असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे जाहीर आभार.- ॲड.शंतनू धोर्डे (बार असोसिएशन सदस्य).