गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीन कायदा करू – मंत्री राधाकृष्ण विखे

गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीन कायदा करू – मंत्री राधाकृष्ण विखे

Just like in Gujarat, let’s make Devasthan Inam land law in Maharashtra – Minister Radhakrishna Vikhe

गुरव समाज शिष्टमंडळाला आश्वासन Assurance to Gurav Samaj delegation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 21Sep24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :महाराष्ट्रातील पुजारी बांधवांवर होणारा अन्याय व देवस्थान इनाम वर्ग ३ बाबत गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीन कायदा करू असे आश्वासन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखिल गुरव समाज संघटना व सर्वधर्मीय पुजारी बांधवांच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती गुरव समाज नगर जिल्हा अध्यक्ष अशोक पांडे यांनी दिली.

 
यावेळी त्यांच्या समवेत अखिल गुरव समाज संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष वसंत बंदावणे, राज्य महिला अध्यक्ष सुरेखा तोरडमल, राज्य कार्याध्यक्ष अनिल तोरडमल, उपाध्यक्ष संजय घोडके, देवस्थान समिती सरचिटणीस रमेश क्षिरसागर, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता बंदावणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके,राहता तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोडके, पाथर्डी तालुकाध्यक्ष रामनाथ जाधव, दिपराज गुरव कोल्हार, दशनाम गोसावी समाज्याच्या वतीने स्वरुप गोसावी, रवी गोसावी , शाम गोसावी, अरुण गोसावी  तसेच बैरागी समाजाचे दिपक गोसावी  आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देताना
यावेळी लोणी येथे झालेल्या भेटीत शिष्टमंडळाने मंत्री ना. राधाकृष्ण विखे  यांच्यासमोर अखिल गुरव समाज संघटना सर्व धर्मीय  पुजारी बांधव यांच्या वतीने महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीनीवर झालेले अतिक्रमण व बेकायदेशीर हस्तांतरण , इनाम जमीनी संदर्भात काही लोकांकडून होणारा त्रास,गुरव पुजारी वर्गाला होणारा त्रास  यासंदर्भात आपली कैफियत मांडली होती.
 देवस्थान इनाम वर्ग ३ च्या देवस्थान खालसा करून देवस्थान आणि इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शंभर-दीडशे वर्षांपासून तुटपुंज्या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या राज्यातील हजारो देवस्थान आणि इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. तसेच या  प्रश्नाबाबत
एप्रिल महिन्यात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड  डॉ.अजित नवले व अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले ते लोणी   पायी मोर्चा काढण्यात आला होता याची ना राधाकृष्ण विखे यांना  आठवण करून दिली. यावर लवकरात लवकर गुजरात प्रमाणेच महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीन कायदा करू  असे मंत्री  विखे यांनी सांगितले. 
  
या संदर्भात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले असता त्यांनीही बेकायदेशीर झालेल्या हस्तांतरण व पुजारी बांधवांवर होत असलेले  अन्यायाबाबत मी स्वतः जातीने लक्ष घालून कारवाई करणार असल्याचे सांगितले. 
चौकट
देवस्थान इनाम जमिनी बाबत कायदा करताना सदर समितीवर पुजारी समाजाचे दोन तीन सदस्य घेण्यात यावे कशा स्वरूपाचा कायदा असेल याबाबत त्यांचे म्हणणे ऐकून नंतरच अंतिम कायदा करण्यात यावा- राज्य प्रदेशाध्यक्ष वसंत बंदावणे

Leave a Reply

You cannot copy content of this page