शिक्षणात जीवन बदलण्याची ताकद-डॉ. सुसेंद्रन
The power of education to change lives-Dr. Susendran
संजीवनी फार्मसीत ‘इंडक्शन’ कार्यक्रम ‘Induction’ program at Sanjeevani Pharmacy
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 21Sep24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पालकांच्या पाल्यांकडून मोठ मोठ्या अपेक्षा असतात. त्यांची अपेक्षा पुर्ती व पाल्यांचे उत्तम करीअर हे केवळ शिक्षणानेच शक्य आहे, कारण शिक्षणामध्ये जीवन बदलण्याची ताकद आहेे’, असे प्रतिपादन टीसीएस कंपनीचे अलायन्सेस विभागाचे आखिल भारतीय प्रमुख डॉ. के. एम. सुसेंद्रन यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते
नवीन विध्यार्थ्यांना संस्थेची शिक्षण पध्दती, नियम, वेगवेगळे उपक्रम, शिक्षकांची ओळख, आणि फार्मसी शिक्षण पुर्ण केल्यावर वेगवेगळ्या संधी या बाबत इंडक्शन प्रोग्राममधुन सांगीतले जाते.
यावेळी व्यासपीठावर संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, हेड-कार्पोरेट रिलेशन्स प्रा. इम्राण शेख, डीन-अकॅडमिक्स डॉ. सरीता पवार उपस्थित होते. इतर सर्व एम. फार्मसी पर्यंतचे विध्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. पटेल यांनी स्वागत करून महाविद्यालयाच्या विविध उपलब्धींबाबत माहिती दिली.
डॉ. सुसेंद्रन पुढे म्हणाले की सर्व विध्यार्थी संजीवनी मध्ये शिकत आहे. संजीवनी हे नाव अद्वितिय आहे. गुरू शुक्राचार्यांच्या या पवित्र भुमित संजीवनी मंत्राचा अविष्कार घडलेला आहे. ग्रामिण भागातील मुलां मुलींना खऱ्या अर्थाने संजीवनी देण्याच्या दृष्टीने संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांनी केले आहे, ही बाब प्रशंसनीय आहे. यशस्वी करीअर घडविण्यासाठी त्यांनी त्रीसुत्रींचा उल्लेख केला. सर्व प्रथम त्यांनी शरीर सुदृढतेकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगीतले की प्रत्येकाने रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम केलाच पाहीजे. कारण मजबुत शरीरातच सुदृढ मन असते. आपले ज्ञान अद्यतन (अपडेट) करण्यासाठी आपल्या क्षेत्रात काय नव्याने अवतरले आहे यासाठी रोज किमान १५ मिनिटे द्यावे. असे केल्यास वर्षाच्या ३६५ दिवसात अद्ययावत ज्ञानाचे भांडार आपल्याकडे होईल. आणि तिसरा मुध्दा त्यांनी सांगीतला की संभाषण कौशल्य चांगले असणे हे खुप महत्वाचे आहे. त्यासाठी रोज किमान १५ मिनिटे आपल्याला अवगत असलेले अद्ययावत ज्ञान किंवा नाविन्यपुर्ण कल्पना दुसऱ्यांना सांगाव्यात. फार्मासिस्टला जगात मागणी आहे, त्यामुळे इंग्रजी भाषेतून संवाद साधणे महत्वाचे आहे. आपण ग्रामिण भागातील आहोत, इंग्रजी जमेल की नाही, ही न्युनगंडता बाळगु नये. मी सुध्दा तामिळनाडू मधिल एका खेड्यातून पुढे आलो आहे आणि मला सुध्दा इंग्रजी भाषेची समस्या होती, परंतु प्रयत्न केला तर सर्व काही होते, असे त्यांनी सांगीतले.
यावेळी डॉ. सुसेंद्रन यांनी टीसीएस मधिल लाईफ सायन्सेस आणि फार्मा क्षेत्रातील आय टी उद्योग भुमिकेबध्दलही सांगीतले. विध्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
Post Views:
75