नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी ४००० क्युसेस पाण्याचा विसर्ग; कोपरगावात ३ इंच पावसाची नोंद

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी ४००० क्युसेस पाण्याचा विसर्ग; कोपरगावात ३ इंच पावसाची नोंद

Godavari 4000 cusecs water release from Nandur madhmeshwar barrage; Kopargaon recorded 3 inches of rain

शहरात गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी; साथीचे आजार फैलविण्याची भीती  Due to overflowing sewers in the city, there is water on the streets; Fear of spreading epidemics

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir22Sep24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर

  कोपरगांव : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला असून गणेशोत्सवात गुरुवारी व शुक्रवारी बऱ्यापैकी २ ते ३ इंच पाऊस झाला असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत ४३८४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे एकुण पाउस दर्शवितात.

  कोपरगाव ४२, रवंदे ३७, सुरेगाव ५१, दहेगाव ३४, दारणा ६ (७६८), गंगापुर ५ (१११२), ईगतपुरी ४३ (३१६२), त्रंबकेश्वर २४ (१५२२), नाशिक ५ (५०५), नांदुर मध्यमेश्वर ५, देवगांव २७ (३०६), ब्राम्हणगांव ८५ (३०२), कोपरगाव ८५ (२६२) पढेगांव ५० (१५३), सोमठाणे २० (१३९), कोळगांव ५७ (२४३), सोनेवाडी ४८ (२३५), शिर्डी ४० (१८३), राहाता ३५ (२०५), राजणगाव खुर्द २९,  (१०९), चितळी ६० (१८४), तर धरण कार्यक्षेत्रात वाकी ५६, भाम १०७ (१८३६), भावली ५२ (३७९७), वालदेवी ८५ (४८७), काश्यपी २० (८४०), गौतमी २८ (१०९५), कादवा ३० (६८५), आळंदी २५, पालखेड २२ याप्रमाणे पाउस झाला आहे. 
       
  तर दारणेत ७२००, गंगापुर ५३५०, मुकणे ६११४, वाकी १७८३, भाम २४६४, भावली १४३४. वालदेवी ११३३, काश्यपी १२४०, गौतमी १४१३. पालखेड ५३३ दशलक्ष घनफुट पाण्याचा साठा झाला आहे. दोन महिने पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक नगर परिसरात पाणीबाणी सुरू झाली होती. शेतकरी हवालदिल झाले होते. जुन महिन्यात पाउस काही प्रमाणांत बरसला त्यावर खरीप पिकाची पेरणी शेतक-यांनी केली पण पिकाच्या वाढीसाठी पाउसच न झाल्याने शेतक-यांच्या हातुन खरीप पिक गेले व त्यांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पिक विम्याची शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच बारमाही गोदावरी कालवे लाभधारक क्षेत्रात रब्बीचे पीक चांगले येईल जर पाऊस पडला नाही तर जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा नाशिक भागातील धरण समूहावर पडणार आहे.  निळवंडे धरण अंतर्गत डाव्या कालव्याची चाचणी ३१ मे रोजी घेण्यात आली.   या समूहात पाण्याचा साठा बऱ्यापैकी असल्याने त्याला पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. या पाण्याचा लाभ भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होईल कारण कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावांतील नागरिकांना पिण्याचे व जनावरांचे पाण्याचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे.   पूर्व भागातही पाण्याची परिस्थिती अवघड आहे. पाऊस नसल्याने जमिनीतील उष्णता प्रचंड वाढलेली आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या पशुधनासाठी हिरवा चारा अजूनही उपलब्ध झालेला नाही, शासन स्तरावर पालकमंत्री विखे पाटील व जिल्हाधिकारी यांनी चारा उपलब्ध करून देण्याबाबत बैठका घेतलेल्या आहेत.  पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांपुढे पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न आहे. 

चौकट                  

 शहरातील विविध प्रभागातील गटारी पालिका प्रशासनाच्या वतीने काढल्या नसल्याने त्या तुंबल्याने विविध नगरामध्ये रस्त्यावर पाणी साठले होते, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याने तो कुजून डासाची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे विविध आजार फैलावण्याची शक्यता आहे.                              

Leave a Reply

You cannot copy content of this page