जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल उपविजेता 

जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल उपविजेता 

  Sanjeevani International School runner-up in district level softball tournament

दर्जेदार शैक्षणिक गुणत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी Brilliant performance in all fields along with quality academic qualifications

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26Sep24, 18.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांवः   शेेवगांव येथे घेण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय   सॉफ्टबॉल स्पर्धेत शिर्डीच्या संजीवनी इंटरनॅशल स्कूलच्या १४ वर्षाखालील,  मुलांच्या व मुलींच्या संघांनी उपविजेते पद मिळविले.  स्कूलचा सर्वच क्षेत्रांमध्ये  ठसा उमटत असल्याची माहिती स्कूलच्या वतीने देण्यात आली आहे, 

१४ वर्षांखालील मुलींच्या संघात सिध्दी तांबे, राजविका कोल्हे, किमया गोंदकर , कल्याणी लुटे, अनुष्का खरात, जुई पाटील, सुरभी जगताप, रितिका गोंदकर , साची अग्रवाल, स्वरा घोडेराव, भुवी कोठारी, विरा विखे, अदविता पांगे, जिनल पंजाबी व आर्या राय यांचा समावेश  होता. तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघात वल्लभ कोते, आयुष  गोंदकर, पार्थ गांगुर्डे, साईराज हाळनोर, सार्थक बाभुळके, ईशान  क्षिरसागर, मित कोली, पृथ्वीराज माळवदे, शाश्वत  कुमार, साईकृष्णा बोराडे, अर्जुन वडांगळे, हामजा सय्यद, गौरव कदम व श्रीजय बोरावके यांचा समावेश  होता.
स्ंजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या डायरेक्टर डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक  जैन, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे यांचेकडून  खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले तर क्रीडा शिक्षक  विरूपक्ष रेड्डी यांनी खेळाडूंना प्रशिक्षण  दिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page